दिपक मापारी दै.खोजमास्टर वाशिम :-जिल्ह्यातील प्रवासी निवारे दयनीय अवस्थेस- विष्णू बाजड
जिल्ह्यामध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे, अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आजपर्यंत निकाली लागलेला आहे, असे निदर्शनास येत नाही, काही रस्त्यांची कामे ही योग्य पद्धतीने करण्यात आलेली आहेत, परंतु त्या रस्त्यांची कामे करत असतांना सदरील रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली आणि ज्या रस्त्यावर जुने बस स्टॅन्ड प्रवासी निवारे होते ते प्रवासी निवारे रस्ता बांधकाम करतेवेळी पाडण्यात आले, जे प्रवासी निवारे सध्या अस्तित्वात आहेत, त्या प्रवासी निवार्यांची अवस्था अतिशय दयनीय स्वरूपाची झालेली आहे, ते प्रवासी निवारे कधी ढासळून पडतील याची हमी घेता येणार नाही, सर्वसामान्य नागरिकांना त्या रस्त्यावर प्रवास करतेवेळी त्या प्रवासी निवाऱ्याचा मोठा फायदा होत होता, पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सर्वसामान्य नागरिक हे त्या ठिकाणी निवारा घेत होते परंतु बहुतांश ठिकाणचे प्रवासी निवारे हे रस्ता बांधकाम करतेवेळी पाडण्यात आले व जे निवारे अस्तित्वात आहेत त्यांची अवस्था दयनीय स्वरूपाची झाली आहे आणि म्हणून दिनांक तीन एक 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की जे प्रवासी निवारे रस्ता बांधकाम करतेवेळी पाडण्यात आले, त्या ठिकाणी नवीन प्रवासी निवारे बांधकाम करण्यात यावे, व ज्या प्रवासी निवाऱ्यांची अवस्था दयनीय स्वरूपाची झाली आहे, त्यांचे नूतनीकरण करण्यात यावे अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांच्याकडे कास्तकार फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष विष्णूबाजड जिल्हाध्यक्ष राम पाटील वानखेडे यांनी केली..
विष्णु बाजड-अध्यक्ष कास्तकार फाऊंडेशन.
सदरील विषय अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे, या संदर्भात सां. बा. विभाग वाशिम यांच्याकडे वेळोवेळी निवेदने दिली, परंतु संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे, सर्वमान्य नागरिकांच्या वेदना लक्ष्यात घेऊन प्रश्न मार्गी लावावा..