अक्षता ..
श्रीराम प्राणप्रतिष्ठा
अक्षता वाटू घरोघर
आपल्याघरचे कार्य
उत्सुक पूर्ण धरोवर
पुण्य कर्म घडे सार्थ
राम स्नेह आम्हांवर
हात झाले सुवर्णाचे
स्वर्ग सुख खरोखर
भक्ती अमृतसोहळा
डोळ्यां दाटे सरोवर
स्वयंसेवा उस्फुर्तता
जाणेआम्हां अलवर
फक्त राम नाम घेतो
कार्यनोंदले नावावर
सिध्द होते भाळला
प्रभू भक्ती भावावर
हृदय अयोध्या नगरी
राम राज्य रे मनावर
कुणासांगू सुख कसे
उत्साह वाहे अनावर
नव मंदिर पाहू सुखे
बोलावणं आल्यावर
पावनभूमी अवतीर्ण
कार्य पूर्ण झाल्यावर
— हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
Users Today : 27