धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा मुजोर कंपन्याकडून मिळवून द्या.. कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्याकडे मागणी..
सण २०२२ सालच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतीपिकांचे नुकसान झाले होते. मात्र, केंद्र सरकारच्या विमा कंपनीने भारांकनाचा निकष चुकीच्या पद्धतीने लावत ५० टक्केच भरपाई दिली. १ लाख ३४ हजारांवर शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना अपात्र ठरविल्या. याबाबत आपण विभागीय समितीकडे स्वत: तक्रार केली होती. या समितीने संपूर्ण भरपाई तसेच पूर्वसूचनांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश देतानाच पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते. पुढे राज्य तांत्रिक सल्लागार समितीनेही हेच आदेश दिले. परंतु, कंपनी हे आदेश पाळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली वसुलीच्या तीन नोटिसा दिल्या. इतके होवूनही कंपनी दाद देत नसल्याने आज कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन या विषयात लक्ष घालण्याबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांचे प्रलंबित २९४ कोटी रुपये लवकर मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी त्यांच्याकडे केली.
सोबतच २०२१ सालच्या प्रलंबित भरपाई व २०२३ च्या खरीप हंगामातील अद्याप अग्रीम न मिळालेल्या शेतकऱ्यांचाही विषय उपस्थित केला.
यावर श्री. गेडाम यांनी आपल्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले.
Users Today : 27