कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर येथे ‘चांदा ऍग्रो कृषी महोत्सव -2024’ या कृषी महोत्सवास उपस्थित राहिलो.
या महोत्सवाच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन व विविध चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी विकासाचे नवे दालन उघडणार आहे.
चंद्रपूरसह राज्यभरातील कृषी उत्पादक कंपन्यांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू असून, ऍमेझॉन सारख्या विविध कंपन्यांशी याबाबत करारबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी लवकरच राज्य शासन स्तरावर अशा कंपन्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली.
आदरणीय सुधीरभाऊंच्या मागणीप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील एकार्जुना येथे भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता दिल्याची घोषणा यावेळी केली आहे.
‘मिशन जय किसान’च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात तांत्रिक शेती, वन शेती, वन औषधी शेती, बांबू शेती, रानभाजी शेती असे विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.