अभ्यास नागरिकांच्या गरजांचा, शुभारंभ लोकहिताच्या कामाचा !

KHOZ MASTER
2 Min Read
अभ्यास नागरिकांच्या गरजांचा,
शुभारंभ लोकहिताच्या कामाचा !
हे सांगताना आनंद होतो आहे की नागरिकांच्या गरजेचा विचार करून अथक प्रयत्नांनी संपूर्ण केज मतदार संघात ‘गावठाण फिडर सेपरेशन योजना’ मंजूर करून घेतली आहे. त्याच्या कामाची सुरुवात काल नांदूर घाट सब स्टेशन ते नांदुर घाट गावठाण फिडर सेपरेशन योजनेचा #शुभारंभ माझ्या हस्ते झाला.
या योजनेला एकूण 80 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून केज मतदारसंघातील गावठाण फिडर सेपरेट करण्यात येणार आहेत.जुन्या 25 KV आणि 15 KV चे ट्रान्सफॉर्मर बदलून त्या ठिकाणी 100 KV चे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. शिवाय, जुन्या झालेल्या 11 KV च्या तारा आणि पोल आवश्यकतेनुसार दुरुस्त वा बदली करण्यात येणार आहेत.
यावेळी श्री अक्षय मुंदडा, कार्यकारी अभियंता दीपक वाघमारे, कार्यकारी उपअभियंता समीर देशपांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती डॉ नेहरकर,केज तालुका अध्यक्ष भगवान केदार, संभाजीभाऊ गित्ते, सुनिल आबा गलांडे, वसंत भाऊ केदार, नांदूर घाट सरपंच युवराज पाटील, उपसरपंच जगदीश आंदळकर, मुरली बप्पा ढाकणे,अशोक मोराळे, राजाभाऊ मुंडे, शिवाजी जाधव, जावेद शेख, पञकार अमोल जाधव,शिवाजी पाटील, राहुल गदळे,सुनिल भाऊ घोळवे,संतोष जाधव, दत्ता सावंत, विकास जाधव, शरद इंगळे, नांदे सर, रघुअण्णा जाधव, ग्रामपंचायत सदस्य कोंडीराम तात्या तारकर,माजी सभापती सुभाष दादा झाडबुके,सखाराम दादा जाधव,धनंजय जाधव ग्रामपंचायत सदस्य,सतीश मोराळे सर ग्रामपंचायत सदस्य,पत्रकार श्रीकांत जाधव,विष्णु शिंदे माळवाडी,रामकरन दादा खाडे खाडेवाडी,कल्याण पवार सादिक भाई पठाण,गुड्डू भैया जाधव, बंडू गोंधळे,प्रकाश दादा मुंडे,महेश भैया शेख शिराज भाई शेख वजीर, पठाण रणजीत बिक्कड सरपंच नाहोली,जगताप तात्या बंडेवाडी,दराडे सरपंच दरडवाडी, बाप्पा हंगे उपसरपंच हंगेवाडी,मदन हिंगे, ग्रामपंचायत सदस्य हंगेवाडी महादेव ढाकणे, ग्रामपंचायत सदस्य हंगेवाडी संदीप जाधव,आनंदा बप्पा हंगे,सौदागर जाधव सर,दिगंबर सुरवसे,शंकर शेंडगे रामभाऊ जाधव,माजी उपसरपंच अमोल जाधव,शिवाजी भोसले,नाना मालदार,प्राध्यापक राहुल गदळे, सिंधी, उपसरपंच शिवाजी पाटील, सुनील घोळवे, राजकुमार पाटील, संतोष जाधव, शहाजी गायके,अभिषेक परबळे व सर्व परिसरातील नागरिक,महावितरण कर्मचारीवर्ग व मान्यवर उपस्थित होते.
0 9 7 1 9 7
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *