पुणे शहरातील विविध विकास कामांची पाहणी

KHOZ MASTER
1 Min Read

आज पुणे शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी प्रशासकीय इमारतीची कामं करताना आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामं करा, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश पाहणी प्रसंगी दिले.

याबरोबरच ‘नोंदणी भवन’ येथील विकास कामांची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. ‘नोंदणी भवन’ची कामं करताना प्रामुख्यानं वीज, वाहनतळ, सोलरपॅनल, जिन्यामधील अंतर, पायऱ्या, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्या दृष्टीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावं. भवनच्या दर्शनी भागात विभागाचं मोठ्या आकाराचं बोधचिन्ह लावावं. भिंतीच्या कामासाठी मजबूत विटेचा वापर करावा. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करा, अशा सूचना दिल्या.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचा ऐतिहासिक वारसा जपून कामं करावीत. इमारतीसाठी टिकाऊ दगडाचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करण्यात यावा. माजी विद्यार्थ्यांच्या कल्पना, सूचनांचा विचार करा अशा सूचना यावेळी केल्या.
इमारती पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीवरचा खर्च कमीत-कमी झाला पाहिजे. वाहनतळाचं नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनाचांही विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचं वारंवार मार्गदर्शन घ्यावं. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटलं पाहिजे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
यादरम्यान शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी इमारत परिसरातील विविध इमारत आणि प्रयोगशाळेची पाहणी करुन संबंधित विभाग प्रमुखाकडून येथील कामांबाबत माहिती घेतली.
0 9 7 1 9 7
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *