
प्रहार च्या वतीने सहाय्यक अभियंता महावितरण चोहोटा बाजार यांना निवेदन
प्रतिनिधी विशाल गवई
चोहोटा बाजार स्मशान भूमी मध्ये कब्रस्थान परिसरातील वं सर्व स्मशान भूमी मध्ये विद्युत विज जोडणी मिळणे बाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडीचे उपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांनी सहाय्यक अभियंता महावितरण चौहोटा बाजार यांना निवेदनातून मागनी केली आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की स्थानिक ग्रामपंचायत ची लोकसंख्या चार ते साडेचार हजार अंदाजे असून सुद्धा कब्रस्तान व स्मशानभूमी मध्ये लाईट ची कोणतीही व्यवस्था नाही. तेथे अंत्यविधी करिता येणाऱ्या लोकांची रात्रीला वीज जोडणी नसल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि पावसाळ्यामध्ये रात्री बे रात्री त्रास होतो. व स्मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था नसल्यामुळे दिवस उजळण्याची वाट पाहावी लागते. व त्यानंतर अंत्यविधी करावा लागते या निवेदनाची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी आघाडीचे उपजिल्हाप्रमुख जीवन खवले व प्रहार कार्यकर्ते व गावकरी मंडळी यांनी निवेदनातून केली आहे
Users Today : 7