गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय समिती, पुणे यांच्या वतीने शनिवार, दि. २० रोजी मंठा शहरातील तीन परीक्षा केंद्रांतून ९१२ पैकी ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ९३ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
मंठा शहरातील जिल्हा परिषद प्रशाला, स्वामी विवेकानंद विद्यालय, रेणुका विद्यामंदिर या तीन परीक्षा केंद्रांमधून ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बैठ्या पथकांची नेमणूक आली
होती. केंद्रसंचालक यांनाही कडक सूचना देण्यात आल्या होत्या. परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
परीक्षा सुरळीत पार पडल्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके व केंद्रसमन्वयक के. जी. राठोड यांनी सांगितले. परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गौतम वाव्हळ, राजेंद्र सानप, कैलास मुळे, शिवाजी देशमुख, बी. आर. ताठे, संतोष मोरे, सचिन राठोड, नेताजी चौधरी, के. एम. धोत्रे, के. बी. कांबळे यांनी परिश्रम घेतले. मंठा पोलिस निरीक्षक मारुती खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
८१९ विद्यार्थ्यांनी दिली नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षा
Leave a comment