सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ६७ प्रकरणांची नोंद – उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Khozmaster
2 Min Read

नागपूर,  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.२४) रोजी उपद्रव शोध पथकाने ६७ प्रकरणांची नोंद करून ५८२०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २३ प्रकरणांची नोंद करून ९२०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून ४०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ४ प्रकरणांची नोंद करून १६०० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून २२००० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकाम मलबा टाकून कचरा टाकणे साठवणे, प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ६००० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाडल्यावर कारवाई करुन 5000 रुपये वसुल करण्यात आले.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २० प्रकरणांची नोंद करून रु ४००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ६ प्रकरणांची नोंद करून रु ६००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *