खोजमास्टर शिरूर तालुका प्रतिनिधी :-फैजल पठाण २६ जानेवारी रोजी शिरूर नगर परिषदेच्या लाटेआळी येथील शाळेच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योगपती प्रकाश धारिवाल, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री सुनील देवधर यांच्या उपस्थितीत पार पडला…
यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या दीड वर्षापासून शिरूर, चाकण ,जुन्नर सह अन्य तीन नगरपालकांसाठी ६०कोटी रुपयाचे विकास कामे आणली आहेत. शिरूर येथील ऐतिहासिक अशा शाळेच्या इमारतीसाठी ३ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला, व या कामासाठी लागणारा अधिकचा निधी कमी पडून देणार नाही अशी ही ग्वाही यावेळी त्यांनी दिली. त्याचबरोबर शहरासाठी महत्त्वकांक्षी असणारी शिरूर शहराची ७१ कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून या योजनेच्या कामाचे टेंडर निघाले असून लवकर या कामाची वर्क ऑर्डर निघून काम सुरू होईल, धारिवाल परिवार हा शिरूर चा विकासासाठी सातत्याने कार्यरत असतो, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे त्यानुसार विकास कामांसाठी योगदान देऊ असेही यावेळी म्हणाले.
यावेळी प्रकाश धारीवाल म्हणाले की, लाटेआळी या शाळेला ऐतिहासिक असा वारसा आहे. १८५२ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या ठिकाणी काही दिवस वास्तव्यात होते तसेच माझे व माझ्या वडिलांचे व शहरातील अनेक जणांचे प्राथमिक शिक्षण या शाळेतून झाले. मी कुठल्याही पक्षाचा नाही माझा पक्ष हा फक्त विकास आहे आणि विकास करणाऱ्यांच्या पाठीमागे आम्ही नेहमीच असतो. शाळेची इमारतीचे काम गुणवत्ता पूर्ण होईल अशी या अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली, या इमारतीचे डिझाईनिंग तांबोळी असोसिएट पुणे यांनी केले असून या कामाचे बांधकाम गांधी कंट्रक्शन शिरूर हे करणार आहेत.
यावेळी भाजपाचे महामंत्री सुनील देवधर म्हणाले की, या ऐतिहासिक वास्तूच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहण्याचा योग मला लाभला. जातीपातीचे राजकारण न करता समाज हिताचे काम करा, चांगले काम करणाऱ्यांना सर्वांचे समर्थन मिळते, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची मुलींनी शिकले पाहिजे अशी तळमळ होती, स्त्रि शिक्षणाचे कार्य करीत असताना फुले दापंत्याला शेण, धोंडे कधी शिव्यांचा लखोटाही सहन करावा लागला परंतु त्यांनी त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले, म्हणून तर आज विविध क्षेत्रात महिला उच्च पदावर पोहोचले आहेत त्या पाठीमागे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे असे यावेळी त्यांनी नमूद केले.
यावेळी शिरूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री विशेष निधीतून शिरूर नगरपालिकेला आत्याधुनिक जेटिंग मशीन देण्यात आले, तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व्हाट्सअप चॅटबोट सेवा व shirur NP care APP चे उद्घाटन झाले व नगरपालिकेवतीने लोकांना ते वापरण्याचे आवाहन ही करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गटाचे )तालुकाध्यक्ष रवी बापू काळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी पद्मावती दिंडे ,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शहराध्यक्ष शरद कालेवार ,माजी नगरसेवक विठ्ठल पवार ,संजय देशमुख, अंजली मयूर थोरात, पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख राजश्री मोरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, बांधकाम विभाग अभियंता पल्लवी खिलारे ,माजी नगरसेवक विनोद भालेराव ,भाजप शिरूर आंबेगाव बेट संपर्कप्रमुख निलेश नवले, मितेश गादिया, शिरूर शहर राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष एजाज बागवान, शिवसेना संघटक सुरेश गाडेकर, उपशहर प्रमुख गणेश गिरे, भरत जोशी, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, किरण बनकर, अविनाश मल्लाव, श्रुतिका रंजन झांबरे, मनीषा कालेवार व शाळा क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका नंदा खंडागळे, शिक्षिका संपदा राठोड, प्रतिभा आहेर, विनिता पडवळ, शिक्षक राजू लांगी, लहू गावडे ,सचिन जाधव आदि नागरिक व शिक्षक यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले व स्वागत जाकीरभाई पठाण यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले, तर मयूर थोरात यांनी सर्वांचे आभार मानले .
ऐतिहासिक अशा शालेय वास्तूचा बदलणार चेहरा मोहरा…!
Leave a comment