संगीता तायडे.(दै, खोजमास्टर)हिंगणा तालुका, नागपूर
श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र व बाल विकास केंद्र लादी ले ऑउट, हनुमान नगर, महाजनवाडी, हिंगणा यांच्याकडून मांडव घोरड येथे शेतकऱ्यांसाठी कृषीजागर कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये गावातील शेतकर्यांनी सहभाग घेतला. यात सात्विक आणि अध्यात्मिक तत्वातून आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी जेणेकरून शेतीचे उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नासाठी लागणारा खर्च कमी होईल. यावर मार्गदर्शन जिल्हा निरीक्षक कल्पना घेरकर आणि श्री अनुराग जाधव यांनी केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पर्यवेक्षक श्री संजय काळसर्पे यांनी शेतकऱ्यांना मिळणारा शासकीय लाभ व त्यातील येणाऱ्या अडचणी वर सविस्तर मार्गदर्शन केले. शासकीय योजनेचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यवा यासाठी मार्गदर्शन केले. व त्याचवेळी शेतकऱ्याचा अडचणी पण सोडवल्या.
म्हणून शेतकऱ्याचा उत्पूर्त सहभाग लाभला.
तेजस्वानी बहु सेवाभावी विकास संस्थेच्या अध्यक्ष वैशाली केळकर यांनी शेतकरी उत्पादन कंपनी तसेच शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या वेळी घाव्याच्या काळजीवर मार्गदर्शन केले, तसेच केंद्राकडून आलेल्या नेहा आदमाने, वर्षा सरदार, सविता थोटे, इत्यादींनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर हिमगुज साधली. कार्यक्रमाच्या यशस्वी करीता तेजस्विनी संस्थेच्या कार्यकारी अधिकारी श्री. मंगेश बोंद्रे यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन मंगेश बोंद्रे व आभार प्रदर्शन विद्या रसाळ यांनी केले यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.