गॅस तुटवड्यावर सरकारचे 3 मोठे निर्णय; पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना जाहीर

KHOZ MASTER
2 Min Read

मुंबई :

छगन भुजबळ यांनी राज्यात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस तुटवड्यावर मोठे निर्णय जाहीर केले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे भारतात ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी LPG Gas Cylinderचा तुटवडा जाणवत आहे.

राज्यात कुठेही गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

🔹 1) काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके

एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. कुठेही गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

🔹 2) आवश्यकतेनुसार केरोसीन वितरण

गॅस तुटवडा गंभीर झाल्यास केरोसीनचे वितरण पुन्हा सुरू करण्याचा पर्याय सरकार विचारात घेत आहे. जिल्ह्यांमध्ये केरोसीनची वाहतूक, साठवणूक आणि वितरण व्यवस्था कशी करता येईल याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. सध्या केरोसीनचा दर सुमारे ६१ रुपये प्रतिलिटर आहे.

🔹 3) महत्त्वाच्या सेवांना प्राधान्य

रुग्णालये, स्मशानभूमी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि शैक्षणिक संस्थांना १०० टक्के गॅस पुरवठा केला जाणार आहे. तर संरक्षण, शासकीय सेवा आणि हवाई वाहतूक क्षेत्रासाठी ७० टक्के गॅस पुरवठा राखून ठेवण्यात येणार आहे.

पेट्रोल-डिझेल दरात वाढ नाही

भुजबळ यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने एलपीजीच्या किमतीत वाढ केली असली तरी Petrol आणि Dieselच्या किमतीत वाढ करण्यात आलेली नाही.

याशिवाय एलपीजीला पर्याय म्हणून कोळसा आणि केरोसीन यांचाही वापर करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 या उपाययोजनांमुळे राज्यातील गॅस पुरवठा लवकरच सुरळीत होईल, असा सरकारचा दावा आहे.

0 9 4 1 9 0
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *