छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,२९ जेष्ठ नागरिकांनी आपल्या प्रगाढ अनुभव व प्राप्त ज्ञानाचा उपयोग कुटुंब व समाजसाठी व कुटुंबीयाच्या हितासाठी करावा व आपली उतराई पुर्णत्वास न्यावी
असे प्रतिपादन चैतन्य जेष्ठ नागरिक सेवा संघ अध्यक्ष सेवा निवृत प्राध्यापक पी,एम, शिंदे यांनी रविवार(ता,२८)रोजी वैजिनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघ द्वारा आयोजित “तीळगुळ घ्या गोड गोड बोला” कार्यक्रमात केले,अध्यक्षस्थानी रवींद्र आप्पा साखरे होते,शिंदे पुढे म्हणाले की,जेष्ठ नागरिकांनी आपले उर्वरित आयुष्य परमेश्वर चिंतनात घालवून मनी संयम
बाळगावा व आरोग्य दायी जीवन जगण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे असे आवाहन ही त्यांनी केले,संघाचे सर्वात जेष्ठ नागरिक झुंबरलालजी शर्मा व उत्तमराव साळुंके यांच्या द्वारे तिळगुळ वाटप करण्यात आले, आरंभी भारतमाता पूजन व राष्ट्रमाता जिजामाई ,छत्रपती शिवाजी महाराज ,सावित्रीबाई फुले, डॉ,बाबासाहब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,खरा तो एकची धर्म ही साने गुरुजी यांची प्रार्थना उत्तमराव साळुंके यांनी सादर केली तर आता विश्वात्मके दिवे हे पसायदान जेष्ठ नागरिक रामेश्वर गायकवाड यांनी सादर केले,जेष्ठ नागरिक संघ कोषाध्यक्ष सुरेश संत,संचालक बबनराव क्षीरसागर,बाबासाहेब गायकवाड,रामेश्वर गायकवाड, सुभाषशेठ बोहरा,भगवानसिंह राजपूत, अशोक जोशी
यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले,प्रास्ताविक सचिव धोंडीरामसिंह राजपुत यांनी केले आभार बाबासाहेब गायकवाड यांनी मानले,या प्रसंगी डिसेंम्बर व जानेवारी महिन्यात ज्या जेष्ठ नागरिकांचे वाढ दिवस आहेत त्यांचे शाल,फुल देऊन व तिळा गुळाचे लाडू देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले,या प्रसंगी वैजिनाथ मिटकरी,बबनराव डोंगरे,नारायण लाडवाणी,
पुंडलिक चव्हाण,कृष्णराव कांबळे, एस, डी,त्रिभुवन, फकिरराव काळे मामा,प्रा,श्रीवास्तव, अशोक आप्पा पवार,सुदाम गोंधळे,सुभाष आंबेकर,श्री,पोटे यांच्या सह शहरातील जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते,