संविधान जागर यात्रेचा आज पाचवा दिवस, धोत्रा. भंनगोजी येथे. संविधान पुजन व स्वागत!

Khozmaster
2 Min Read
मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज .(धोत्रा- भंनगोजी):–
संविधानाला वंदनीय मानणारा कोणताही व्यक्ती  आमिषांना, दबावतंत्राला बळी पडणार नाही. आम्ही फुले, शाहू आंबेडकरांचे विचारांचे वारसदार आहोत. आम्ही विकल्या जाणार नाही, आमचा संविधानावर विश्वास आहे असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी संविधान जागर यात्रेदरम्यान पाचव्या दिवशी  धोत्रा भंनगोजी येथे केले. यावेळी समाधान सुपेकर, कुणाल बोंद्रे, सत्येंद्र भुसारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.२७ जानेवारीपासून सुरू झालेली संविधान जागर यात्रा ९ दिवसांत चिखली विधानसभा मतदारसंघातील १०२ गावांचा प्रवास करणार आहे. काल, ३० जानेवारीला संविधान जागर यात्रेचे डासाळा, टाकरखेड, करवंड, खामखेड, गोंधनखेड, कव्हळा, सावरखेड नजिक, करणखेड, दहीगाव, बोरगाव काकडे, तेल्हारा, पेठ आणि उत्रादा गावात जोरदार स्वागत झाले. रात्री १० नंतर देखील पेठ आणि उत्रादा गावातील सभांना चांगलीच गर्दी जमली होती. गावागावात मिळणाऱ्या जोरदार प्रतिसादामुळे प्रत्येक गावात पोहचण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा उशीर होत होता. संविधान जागर यात्रेचा आज, ३१ जानेवारीला ५ वा दिवस आहे. काल, रात्री यात्रा धोत्रा भनगोजी येथे मुक्कामी होती. आज सकाळी धोत्रा भनगोजी येथून यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा आज आंधई, शेलोडी, शेलसुर, धोडप, डोंगरशेवली तर दुपारनंतर किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, केळवद, शिरपूर या गावांत पोहचणार आहे. संविधानाच्या रक्षणासाठी या यात्रेत बहुसंख्येने सहभागी होण्याची आवाहन चिखली विधानसभा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *