Saturday, February 24, 2024

मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन.

चिखली -1% टक्का बटाव म्हणून लूट करणाऱ्या खाजगी अडत व्यापारांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी
चिखली शहरातील एम.आय.डी.सी परिसरातील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असून शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालावर त्या ठिकाणी असलेले खाजगी अडत व्यापारी हे 1% बटाव म्हणून शेतकऱ्यांची लूट करीत होते त्यांना विरोध केला असता गेट बंद करून ते मारण्याच्या धमक्या देत असल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी हे बाब मनसे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मनसे पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह सहा. निबंधक सहकारी संस्था व कृषी उत्पन्न बाजार समितीला या गैर कायदेशीर मंडळी वर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. त्यामुळे प्रकाराची सत्यता पाहण्या करिता सहा. निबंधक राजेश घोंगे साहेब व कृषी उत्पन्न बाजार समितीचे पटेल व बनसोडे हे मनसे पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांना घेऊन एम.आय.डी.सी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी गेले तेथील काही अडत व्यापाऱ्यांनी घेतलेला बटाव शासकीय अधिकाऱ्यासमक्ष परत केला. परंतु गोविंद अशोक अग्रवाल यांनी तसे न करता सहाय्यक निबंधक घोंगे साहेब व शेतकऱ्यांना 50 ते 60 माणसे बोलवित पैसे परत देण्यास स्पष्टपणे नकार दिला त्या ठिकाणी त्यांना विरोध दर्शविला असता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गोविंद अग्रवाल यांनी मनसे हे आमच्याकडे खंडणी मागायला आले असल्याचे खोटे आरोप करीत गुन्हे दाखल केले. त्यामुळे आज दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी रानअंत्री, एकलारा अंबाशी, मनुबाई शिवारातील काही शेतकऱ्यांनी तहसीलदार सुरेश कव्हळे साहेब व ठाणेदार साहेब चिखली यांना मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निवेदन दिले. निवेदनामध्ये नमूद शेतकऱ्यांसोबत मनसे पदाधिकाऱ्यांसह शासकीय कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. केवळ राजकीय सुडापोटी मनसे पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र वास्तविक पाहता अडत व्यापारी शेतकऱ्यांकडून शेतमालाचे एक टक्का बटाव रक्कम कपात करीत असून ही स्पष्टपणे अवैध सावकारी असून शेतकऱ्यांची लुटमार आहे तरी मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे व शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या या खाजगी अडत व्यापाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी त्यावेळी करण्यात आली. त्या ठिकाणी मुकुंद झाल्टे,गजानन झाल्टे, अभिषेक झाल्टे, अरविंद झाल्टे, सतीश घोंगडे, गजानन भाकडे, भगवान भाकडे , गणेश जागृत, अमोल साळवे, पवन झाल्टे, प्रमोद वायाळ, संजय दळवी, अंकित इंगळे, प्रवीण देशमुख, यांसह अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang