मेहकर पोलीस ठाण्यात मेंढपाळ बांधवांशी गैरवर्तन केले – गजानन बोरकर अमलदारावर निलंबनाची मागणी; अन्यथा २२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

KHOZ MASTER
2 Min Read

मेहकर, ता. मेहकर प्रतिनिधी :
मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या अन्यायग्रस्त मेंढपाळ बांधवांशी स्टेशन डायरीवरील अधिकारी अमलदार यांनी अर्वाच्य भाषेत वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस उपविभागीय अधिकारी, मेहकर यांच्याकडे लेखी निवेदन देऊन संबंधित अमलदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० फेब्रुवारी रोजी वडगाव तेजन येथे काही समाजकंटकांकडून मेंढपाळ बांधवांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी स्वप्नील हाके, दीपक हाके आणि लक्ष्मण खताळ (रा. कोनटी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) हे अन्यायग्रस्त मेंढपाळ बांधव मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आले होते.
निवेदनानुसार, त्या वेळी स्टेशन डायरीवरील अधिकारी अमलदार भांडे हे रात्री अंदाजे १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान डायरी टेबलवर झोपलेले होते. तक्रार नोंदविण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी “माझी झोप खराब करायला का आलात? तुम्ही त्याच्या शेतात का गेले?” अशा प्रकारे अर्वाच्य भाषेत बोलून तक्रारदारांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सामान्य नागरिकांशी असभ्य वर्तन होत असून, लोकशाही मूल्यांचा अवमान होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अमलदार व त्यांच्या सहकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास २२ मार्चपासून लोकशाही मार्गाने आंदोलन तसेच आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदन गजानन माधव बोरकर यांनी दि. ४ मार्च रोजी सादर केले आहे

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *