शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष– अनिल देशमुख केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेल्या अंतरीम अर्थसंकल्पातुन शेतकऱ्यांच्या समोर असलेल्या प्रश्नासंदर्भात पुर्ण पणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी घोषणा आज परत करण्यात आली. परंतु जो माल शेतकरी बाजारात आणतात त्याला भाव मिळत नाही. देशात मोठया प्रमाणात उत्पादन होवून सुद्धा विदेशातुन कापुस, तेल, दाळ आयात करण्यात येते. याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात कर्ज देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. परंतु बाजारात शेतमालास भाव मिळत नसल्याने त्याच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. यामुळे देशात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहे. एकुणच आजच्या अंतरीम अर्थसंकल्पातुन शेतकऱ्यांच्या पदारात काहीच पडले नाही. व्यापारी,गरीब, सामान्य नागरीक यांना सुध्दा कोणताही दिलासा देण्यात आला नाही.