Saturday, February 24, 2024

छत्रपती संभाजीनगर येथे हाॅटेल रामगिरी जवळ गॅसचा टॅकर पलटी

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत नागरिकांनी सावधानी बाळगावी; प्रदीप जगताप यांचे आवाहन
 संभाजी नगरातील शहरवासीयांना विनंती करण्यात येत आहे की सिडको बस स्टँड जवळील हॉटेल रामगिरी समोर एलपीजी गॅसचा टँकर पलटी झाल्यामुळे मोठा अपघात झालेला आहे आणि या टँकर मधून गॅस गळती होत आहे यासाठी अग्निशमन यंत्रणा तत्परतेने कार्य करत आहे परंतु या अपघातात स्थळी येण्यास माननीय जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने मनाई हुकूम आदेश केला आहे तेव्हा सर्व जनतेस विनम्र विनंती आहे की या परिसरात सध्या जाण्यास टाळावे तेथे जाण्याचा प्रयत्न करू नये एवढे सहकार्य करून पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे परिस्थिती गंभीर आहे परंतु प्रशासन तत्पर त्याने कार्यास लागलेले आहे याची गंभीरतानी दखल घेऊन नागरिकांनी प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शिवव्याख्याते प्रदीप जगताप यांनी केले आहे.जालना रोड वसंतराव नाईक चौक उडान पुलाजवळ एन-4 सिडको या ठकाणी एच. पी. कंपनीचे गॅस टँकरला अपघात होऊन सदर गॅस टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालेली असून सदर गॅस हवेमध्ये पसरलेला आहे व पसरत आहे सदर अपघात स्थळाचे आजूबाजूचे परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक रहातात तसेच लोक जमा होत आहेत करिता सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेता सदर ठिकाणी जिवीत अथवा वित्त हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याअर्थी, मी जनार्धन विधाते अपर जिल्हादंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये, मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, याद्वारे छत्रपती संभाजीनगर खबरदारीचा उपाय म्हणून जालना रोड वसंतराव नाईक चौक उडान पुलाजवळ एन-4 सिडको या ठकाणी एच. पी. कंपनीचे गॅस टँकरला अपघात होऊन सदर गॅस टँकर मधून मोठया प्रमाणात गॅस गळती झालेली असून सदर गॅस हवेमध्ये पसरलेला आहे व पसरत आहे सदर अपघात स्थळाचे आजूबाजूचे परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक रहातात तसेच लोक जमा होत आहेत करिता सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेता सिडको एन-3, एन-4, एन-5 परिसरातील सर्व शाळा व आस्थापना बंद ठेवणे बाबत बंदी घालण्यात येत आहे.सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने तसेच वन्य पशु पक्षांचे जिवीतास धोका निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे.अशी माहिती शिवव्याख्याते प्रदीप जगताप पाटील मयूर पार्क छत्रपती संभाजीनगर यांनी बोलताना दिली आहे.
- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang