पी.आर.डी. क्रिकेट चषक म्हणजेच क्रीडा प्रेमींसाठी मेजवानीच……

Khozmaster
4 Min Read

खोजमास्टर प्रतिनिधी:- फैजल पठाण.    शिरूर येथील माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे यांच्या वतीने आयोजित मा .नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल चषक (पी आर डी) टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेत संकल्प प्रतिष्ठान मंचर  संघाने प्रथम क्रमांक मिळवून पी आर डी चषकाचा  एक लाख ११ हजार रुपयांचा  मानकरी ठरला, तर द्वितीय क्रमांक चा मानकरी टी 20 स्पोर्ट बेल्हा ठरला तर संपूर्ण सामन्याचा आदित्य धारीवाल मॅन ऑफ द सिरीज  इलेक्ट्रिक मोटर सायकलचा विशाल निगोट मानकरी ठरला आहे.
शिरूर येथे माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, शिक्षण मंडळ सदस्य प्रशांत शिंदे यांच्या वतीने उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल व शिवसेवा सचिव स्वर्गीय केशरसिंग खुशाल सिंग परदेशी या दोन मित्रांच्या स्मरणार्थ मा .नगराध्यक्ष सभागृहनेते प्रकाशशेठ रसिकलाल धारिवाल चषक( पी आर डी) डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्योगपती तथा शिरूर नगरपरिषद सभागृह नेते प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,हिंगोली चे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, शिवसेवा मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास परदेशी, माजी नगरसेवक संतोष भंडारी, संपदा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर ढेरे, उद्योजक सुभाष गांधी, संतोष कडेकर, डॉ.संतोष पोटे, अमोल भोसले, रांजणगाव गणपतीचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर,रंजन झांबरे,नगरसेवक अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार , ,स्पर्धेचे आयोजक रविंद्र ढोबळे ,स्पर्धेचे संयोजक प्रशांत शिंदे, श्रीहरी नरवडे, मयुर नहार,रवींद्र खांडरे, मितेश गादिया संजय ढमढेरे,
तिरंगा बिर्याणीचे फिरोज शेख ,संतोष शिंतोळे,
समालोचक नरेश ढोमे,फिरोज भाई बागवान ,दत्ता पवार, ,गुलाम पठाण ,रविंद्र जाधव , सागर ढवळे ,राहुल पवार सनी दळवी , दगडू त्रिमुखे,  अमोल पवार बाळासाहेब साळवे, पोपट चव्हाण,राजेंद्र ढोबळे विजय ढोबळे अजय ढोबळे तुषार माने ऋतिक ढोबळे तेजस माने, रवींद्र गुळादे, राजेंद्र माने , तुषार माने, चेतन माने ,संतोष माने , कुणाल धाडीवाल, निलेश पवार, यश ढोबळे, अनुराग ढोबळे, ओम ढोबळे,उपस्थित होते..
प्रथम क्रमांक संकल्प प्रतिष्ठान मंचर एक लाख अकरा हजारांचा चा मानकरी, द्वितीय क्रमांक  टी 20 पोर्ट क्लब बेल्हा ७५ हजाराचा मानकरी, तृतीय क्रमांक साईराम 11 शिरूर हा ६१ हजाराचा मानकरी, चतुर्थ क्रमांक महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर ४१ हजाराचा मानकरी.

उद्योगपती आदित्य शेठ धारीवाल मॅन ऑफ द सिरीज हिरो होंडा मोटरसायकलचा मानकरी विशाल निगोट ठरला, उत्कृष्ट फलंदाज संदीप गायकवाड एलईडी टीव्ही, उत्कृष्ट गोलंदाज अजू बेपारी एलईडी टीव्ही, उत्कृष्ट किपर सनी दळवी, उत्कृष्ट झेल सतिश गावडे , सलग तीन विकेट प्रमोद बोऱ्हाडे, सलग तीन षटकार विशाल नीगोट, सलग तीन चौकार अभी खंडागळे या पाचही जणांना सायकल भेट देण्यात आली.
शिरूर सारख्या शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिशय सुंदर उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल पी आर डी चषक क्रिकेट स्पर्धा भरवून शिरूर शहराचा नावलौकिक संपूर्ण राज्यात पोहोचवण्याचे काम माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे , प्रशांत शिंदे यांनी केले असल्याचे मत उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांनी   यांनी व्यक्त केले.
शिरूर येथे भरवलेल्या पीआरडी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये या क्रिकेट स्पर्धेत ऑनलाईन युट्युब वर प्रक्षेपण ठेवण्यात आले होते . तर मैदानात लावलेली एलईडी स्क्रीनवर थेट सामन्याचे प्रक्षेपण, रयत शिक्षण संस्था शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सुंदर प्रकारच्या गॅलरीज सुंदर प्रकारचे स्टेडियम सजवण्यात आली होती यामुळे या स्टेडियम आयपीएल सारखा भास जाणवत होता या स्पर्धा पाहण्यासाठी शिरूर श्रीगोंदा पारनेर हवेली या तालुक्यातून हजारो नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत रवींद्र ढोबळे व प्रशांत शिंदे सर यांनी केले तर आभार जयवंत साळुंखे यांनी मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *