Saturday, February 24, 2024

पाणथळ जमिनीचे संवर्धन काळाची गरज ; पर्यावरण प्रेमी प्रदिप पट्टेबहादुर

रिसोड ; दि.2 फेबु, पर्यावरण प्रेमी वन्यजीव रक्षक सर्पमित्र तथा राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था प्रतिनिधी तथा निहरू युवा बहुउद्देशिय मंडळ केकतउमरा अध्यक्ष तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन व स्वच्छ भारत पुरस्कार प्राप्त भारत सरकार  मा. राष्ट्रिय युवा कोर जे देश वासियांना आव्हान केली की पाणथळ जमिनीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.  भारतात  जवळपास 4.6% पाणथळ जमीन आहे आणि हे क्षेत्र 15.26 दशलक्ष हेक्टर असून  त्यामध्ये 42 स्थानांचा वेटलँड ऑफ इंटरनेशनल इम्पॉर्टन्स  (रामसर साइट्स) म्हणून समावेश आहे , ज्याचे पृष्ठभाग क्षेत्र 1.08  दशलक्ष हेक्टर आहे. पाणथळ जमिनींचे  संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर या ठिकाणी आयोजित परिषदेत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ,
नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्सशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो.
दुर्दैवाने आज पाणथळ प्रदेशांकडे ‘वाया गेलेली जमीन’ म्हणूनच पाहिले जाते, पण जैविक आणि पर्यावरणीय साखळीतील त्यांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन ते जतन करून, तिथला कचरा इ. दूर करून त्यांचा सजगतेने वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवर सुध्दा पाणथळ प्रदेश वाचविण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते. असे आव्हान व सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी वन्यजीव संरक्षक प्रदीप पट्टेबहादूर महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त यांनी जनतेला केले आहे. आपल्या प्रत्येकाच्या खारीच्या वाटयाने पृथ्वीवरची ही महत्त्वाची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि पर्यावरणाची बूज राखली जाऊ शकते.
- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang