वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर – कवठे येमाई त ग्रामसुरक्षा दल तात्काळ कार्यान्वित करणार – शिरूरचे पी आय गुंजवटे यांची ग्रामस्थांसमवेत कवठे येमाईत बैठक संपन्न

Khozmaster
2 Min Read

कवठे येमाई दि. ०९ (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील विशेषेकरून सविंदणे,कवठे येमाई,वाड्या वस्त्या व परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या चोऱ्यांना आळा बसावा या हेतूने पोलिसांच्या मदतीला आता स्थानिक गस्ती पथक अर्थात ग्रामसुरक्षा दल ही सोबतीला राहणार असून त्या दृष्टीने लोकांमध्ये जनजागृती व्हावी व कार्यंवित करण्यात येत असलेल्या ग्रामसुरक्षा दलाला थेट व योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी येथील ग्रामपंचायत सभागृहात बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला शिरूर चे पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले फौजदार मांडगे,शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे,उपसरपंच उत्तमराव जाधव,माजी सरपंच दीपक रत्नपारखी,सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर,अविनाश पोकळे,गुलाब वागदरे,निलेश पोकळे,किसन हिलाळ,राजेंद्र इचके,अनेक ग्रामपंचायत सदस्य,तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
ज्योतीराम गुंजवटे – पोलीस निरीक्षक,शिरूर पोलीस स्टेशन
” काही दिवसांपूर्वी सविंदणे येथे घडलेली जबरी चोरीची घटना,या परिसरात सातत्याने होत असलेल्या ट्रान्स्फार्मर चोरीच्या घटना यामुळे हा भाग नक्कीच दहशती खाली असणार आहे. पोलीस गाडी नियमितपणे या भागात रात्र गस्तीवर फिरत असून वाढत्या चोऱ्यांच्या घटनांना आळा बसावा म्हणून आजच कवठे येमाईत ४० सदस्यांचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करीत आहोत. वाड्या वस्त्यांवरील तरुणांनी ही आपापल्या भागात गस्त सुरू करावी. संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा.पोलीस नक्कीच शक्य तितक्या लवकर मदतीस येतील.”
डॉ.सुभाष पोकळे – सदस्य,शिरूर पंचायत समिती
“गुंजवटे साहेबांसारखे नव्यानेच आलेले एक चांगले पोलीस अधिकारी शिरूर ला मिळाले आहेत.त्यांच्या व पोलीस अधिकारी सहकाऱ्यांच्या माध्यमातून या परिसरात सातत्याने घडत असलेल्या चोरीच्या घटनांना नक्कीच आळा बसेल.पोलीस हे देखील माणसेच आहेत. आमचे ग्रामस्थ,ग्रामसुरक्षा दलातील जवान ही त्यांना नक्कीच सहकार्य करतील”.
या परिसरात बोकाळलेले अवैध दारू धंदे,त्यामुळे बरबाद होत चाललेली तरुण पिढी,अनेकांचे उध्वस्त होत चाललेले प्रपंच व त्यातून होऊ शकणारी गुन्हेगारी याला कायमचा पायबंद कधी बसणार ? याबाबत अनेक तरुणांनी प्रश्न उपस्थित केले.यावर पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी या भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस तात्काळ ठोस कारवाई करतील. पुन्हा तसे कृत्य करताना कोणी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे इथून पुढे तरी अवैध दारू धंदे,जुगार,मटका,करणारांवर चाप बसेल व परिसरात शांतात नांदण्यास नक्कीच मदत मिळेल असा विश्वास उपस्थित अनेक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *