संत सेवालाल महाराज एक महापुरुष आणि पराक्रमी महात्मा ; डॉ सचिन पवार

Khozmaster
3 Min Read

वाशिम ; संत सेवालाल महाराज मानवतावादी संत होते.संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी गोलार दोडी तांडा ता.गुंटी,जिल्हा अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे बंजारा समाजातील एका गावात पशुपालक कुटुंबात भीमा नायक रामावत व आई धर्मानी यांचाकडे झाला. भीमा नाईक यांना चार मुलं होते त्यात सेवालाल हे ज्येष्ठ होते. संत सेवालाल हे लहानपणा पासून विरक्त स्वभावाचे होते. संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. त्यांनी मानव कल्याणासाठी गोरक्षा करण्याचा, मानवतेचा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ते धर्माचे रक्षण करण्यासाठी निजामाशी लढले.तसेच अनिष्ट रूढी आणि शोषणाविरुद्ध वाणीतून सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रहार केला. त्यांची जयंती महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात शासन स्तरावर साजरी केली जाते. बंजारा समाजाचे महान तपस्याचे दैवत संत सेवालाल महाराज हे अन्नपद भटक्या जातीचे मार्गदर्शक, समाजसुधारक व क्रांतिकारक भगवंत होते.संत सेवालाल महाराज

बंजारा समाजाचे कुलदैवत संत सेवालाल महाराज एक महापुरुष आणि पराक्रमी महात्मा होते. हे महान संत आणि थोर समाज सुधारक होते.

 

संत सेवालाल महाराज समाज प्रबोधनाची शिकवण या जगाला दिलेली आहे.तेमजे

जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा, स्त्रियांचा आदर करा,आणि मुली जिवंत देवी आहेत, भेदभाव करू नका, खोटं बोलू नका, व्यसन करू नका, गरजूंना अन्न द्या. सन्मानाने आयुष्य जगा., काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड द्या, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा.वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा, माणुसकीवर प्रेम करा.,

देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही प्राणिमात्रांचा बळी देऊ नका. आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा. कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करु नका.जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका, जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहात.हे लक्षात घ्या. वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा.आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा. अशी थोर शिकव संत सेवालाल महाराज यांनी दिली आहे. त्यांच्या विचाराचा वारसा तरुणांनी आणि समाधानी अंगी स्वीकार करून कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी डॉ.सचिन पवार यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनास्पद केले आहे. तर

संत सेवालाल महाराज यांचे रुईगड येथे निधन झाले. आणि महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आजही जगदंबेच्या मंदिरा शेजारी आहे. लाखो समाज बांधव या ठिकाणी त्यांच्या समाधीवर नतमस्तक व अभिवादन करिता दरवर्षी पोहरादेवी येथे येतात..

0 9 3 7 0 9
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *