जीनीग चालकाकडुन शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याची लुट…

Khozmaster
1 Min Read

गजानन माळकर पाटील तालुका प्रतिनिधी मंठा. वेगवेगळ्या जिनींग मध्ये भावात तफावत…मंठा शहरातील सुरज इण्डस्ट्रीज नावाच्या जीनीग फॅक्ट्रित शेतकऱ्यांचे ज्याला आपन पाढरे सोने म्हणतो त्या सोन्याची पार विल्हेवाट लागली असुन शेतकऱ्यांनी आपल्याजवळील दागदागिने ठेवून ,सावकारी करून महागामोलाची बी बियाणे,कीटक नाशके खरेदी केली व रात्रदिवस काबाड कष्ट करून,घाम गाळून आसमानी व सुलतानी संकटावर मात करत कापुस पिकवीले व बेभाव वेचणी करून घरात आनले व ज्यावेळी विक्रीला काढले त्यावेळी भाव घसरले आणि त्यातही जिनींग चालक दोनशे ते तीनशे रूपयांनी लुट करत असल्याची शेतकऱ्यांनी गुप्त तक्रार पत्रकाराकडे केली.

काही सामाजिक कार्यकर्ते सोबत घेऊन पत्रकार या जिनींग मध्ये गेले असता तेथील सुपरवायझर घोडके यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांना

बोलवत नाही तेच खुद येतात व तुम्ही आलेच कसे असा उलट शब्द पत्रकारांना केला व उडवा उडविची उत्तरे दिली‌.

कापुस आमच्याच जीनीग मध्ये यावे यासाठी कापुस वाहुन आननाऱ्या संबंधित गाडी वाहतुक करणाऱ्या चालक मालकास भाडे व क्विंटल मागे शंभर रूपये कमीशन देत असल्याने शेतकऱ्यांची लुट होते जिनींग चालक क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रूपये लुट करत असेल तर त्या शेतकऱ्याने मुलींचे लग्न,मुलांचे शिक्षण,उसनवारी,सावकारी कशी फेडायची असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

यामुळे स्थानिक आमदार तसेच संबंधितांनी शेतऱ्यांची लुट थांबवावी अशी माहीती अशोक नाना वायाळ यांनी दिली…

बाईट अशोक वायाळ सामाजिक कार्यकर्ते, मंठा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *