जुनी कामठी पोलिसांची कारवाई / हद्दपार ईसमास शस्त्रासह अटक, घरफोडीचा गुन्हा उघडकीस
कामठी नागपूर : दिनांक १७.०२.२०२४ चे ०६.१० वा. ते ०७.०५ वा. चे दरम्यान, जुनी कामठी पोलीसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना खात्रीशीर माहीती मिळाली की एक हद्दपार ईसम पोलीस ठाणे हद्दीत फिरत आहे. अशा माहितीवरून बैल बाजार, दुर्गा चौक, कामठी येथे गेले असता, समोरील गल्लीतुन एक ईसम पोलीसांना पाहुन पळु लागल्याने, त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव सचिन उर्फ वांग्या राकेश कुंभरे, वय २४ वर्षे, रा. जुनी कामठी, नागपूर असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेत एक लोखंडी धारदार चाकु तसेच एक मोबाईल फोन मिळुन आला. आरोपीचा अभिलेख तपासला असता, त्यास मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ क. ५, यांचे आदेश क. पोउपआ./परि-५/ हद्दपार/ २०२३-०२ दिनांक ३१.०१.२०२३ अन्वये दोन वर्षाकरीता नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतुन हद्दपार केल्याचे दिसुन आले. आरोपीस सखोल विचारपूस करून मोबाईल बाबत विचारले असता आरोपीने नमुद मोबाईल दिनांक ०४.०२.२०२४ रोजी पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीतील चकोले यांचे देशी दारूचे दुकानाचे टिनाचे दरवाज्याचे लॉक तोडुन दुकानातील सि.सी.टी.व्ही कॅमेरा, मोबाईल व चिल्लर १,६००/- रू चोरून नेल्याची कबुली दिली. आरोपी कडून एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून लोखंडी चाकु व घरफोडीचे गुन्हयातील मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी हा विनापरवाना हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून शस्त्रासह फिरतांना मिळुन आल्याने, त्याचे विरूध्द पोहवा दिलीप ढगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जुनी कामठी येथे कलम १४२, १३५ म.पो.का. सहकलम ४/२५ भा.ह.का अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.