पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना भेटायला येणाऱ्या नागरिकांना तासन्तास बसण्याचा मनस्ताप .
नागपुर दी 6 मार्च .नागपुरात रवींद्र सिंगल पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले. ते प्रेस क्लब ला जाऊन मीट द प्रेस पण करून आले.
पण जे नागरिक आपल्या तक्रारी घेऊन पोलीस आयुक्तांना भेटायला येतात त्यांना मनस्तापाला सामोरे ज्याला लागते.
नागरिकांना संभदित पोलीस स्टेशनला तक्रार करून सुद्धा ज्या वेळेस समाधान मिळत नाही त्यावेळेस नागरिक आपल्या तक्रारी घेऊन पोलीस आयुक्तांना भेटायला येतात .
पण पोलीस आयुक्त कार्यालयात नागरिकांना वेगल्यास मनस्तापाला सामोरे जायला लागतं . कर्यालातल्या कर्मचाऱ्यांना कधीच माहिती नसते की पोलीस आयुक्त केव्हा उपलब्ध राहतील .
त्यामुळे नागरिकांना सारख्या चक्रा माराव्या लागतात.पोलीस आयुक्त जरी कार्यालयात असले तरी नागरिकांना ही माहिती देण्यात येत नाही की आयुक्त किती वेळ मीटिंग मध्ये व्यस्त राहतील.
ह्या त्रासापासून पत्रकार पण सुटलेले नाही. एक पत्रकार पोलीस आयुक्त यांना भेटायला दोन ते तीन वेळा वेगळ्या वेगळ्या दिवशी पोलीस आयुक्त कार्यालयात येऊन बसून राहिले. पोलीस आयुक्त कर्यालात रिसेप्शन काउंटरवर कोणीही जिम्मेदार व्यक्ती नसतो. जो व्यक्ती स्वागत कक्षात असतो त्या व्यक्ती ला हे ही माहित नसते की आयुक्त बाहेर गेले आहेत तर केव्हा कार्यालयात परत येतील की आयुक्त त्या दिवशी येणार आहेत की नाही.
गरज आहे की नागरिकांना भेटण्याची एक विशिष्ट दिवस आणि वेळ ठरावण्यात यावी. ज्या मुळे नागरिकांना त्रास होणार नाही. त्याशिवाय वेटींग रूम मध्ये जागा ही अपुरी आहे .पोलीस अधिकारी पण त्याच खोलीत बसतात जे आयुक्तांना भेटायला येतात. त्याच्या मुळे बऱ्याच नागरिकांना उभे राहून प्रतीक्षा करावी लागते.