गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
लग्नसराईने एसटी बसमध्ये गर्दी
मंठा सद्यः स्थितीत उन्हाचा पारा चांगला वाढला आहे. तालुक्याचे तापमान ४१ अंशांवर पोहोचले आहे. तसेच उन्हाळा असल्याने लाप्रसंगी प्रवाशांची गर्दी बसस्थानकात बाढली आहे. परिणामी येथील बसस्थानकातून एसटी बस हाऊसफुल्ल प्रवाशांनी धावत आहे.
एप्रिल मे महिन्यास प्रारंभ झाला आहे. या महिन्यात लासराईचा चांगलाच ठोक आहे. नंतर महिनाभर तरी लग्राची तिथी नसल्याने अनेकांतून सांगण्यात येत आहे. अशातच उष्ण तेचा पाराही चांगलाच वाढला आहे.
अशातच लग्रसराईमुळे एसटीमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. येथून जाणाऱ्या प्रत्येक बसमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी दिसून येत आहे. तसेच खासगी वाहनानेही गाव जवळ करण्याचाप्रयत्न नागरिक करताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. सद्यःस्थितीत लघुसराई आणि सुट्यांचा काळ आहे. यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी बाढ झाली आहे. एसटीच्या प्रवासात अमृत ज्येष्ठ नागरिकयोजनेंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोफत
प्रवास योजना सुरू केला आहे. महिलांना सरसकट ५० टक्के सवलत लागू केली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत आधीच बाद इराली होती. त्यात आता लगणसराई सुरू असल्याने उन्हाळ्यांच्या दिवसांत एसटीच्या प्रवासी संख्येत अधिकच वाढ झाली आहे. एसटीच्या प्रवासाला सवलतधारक प्रवाशांकडून प्राधान्य दिले जात आहे. अशातच काहींची खासगी वाहनांकडे धाव दिसून येत आहे. पूर्वीच्याच भंगार गाड्यांतून ग्रामीण भागात प्रवाशांची वाहतूक महामंडळाकडून केली जात आहे.