निर्दोष युवकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या :- अनिल जांगळे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Khozmaster
2 Min Read

नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : दि. ३१.०५.२०२२ रोजी रात्री १० वाजे दरम्यान नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीमधुन जात असलेले वाहन MP-04 HE-1980 ह्या क्रमांकाच्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश कोंबुन नेत असल्याची धक्कादायक माहिती समजताच काही हिंदू युवकांनी सदर ट्रक अडविला. या ट्रकमधे गोवंश कोंबून नेत असल्याची सत्यता यातून समोर आली तसेच यामध्ये सात-आठ गोवंश मृत्युमुखी पडले असल्याचे दिसुन आले यावेळी जमलेल्या संतप्त जमावाने ट्रकमधील गोवंश सुरक्षित बाहेर काढून ट्रक पेटवून दिला.यामधे पोलिसांमध्ये व युवकांमध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले.यातून रस्त्याने जाणाऱ्या निर्दोष युवकांना ही पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागले.कशाचाच कशाशी काहीही समंध नसतांनाही आपल काम आटोपून घरी जाणाऱ्या काही युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.

गुन्ह्यातील नमुद आरोपींचा कथीत गुन्ह्याशी दुरान्वयेही काही एक संबंध नाही व त्यांना सदर गुन्ह्यात विनाकारण गोवण्यात आले आहे. घटनास्थळी त्यावेळी शेकडो लोकांचा जमाव झाला होता, परंतू नांदुरा पोलिसांनी त्यावेळी राज्यात असलेल्या सरकारच्या दबावात येवून कोणतीही कायदेशिर व निष्पक्ष चौकशी न करता त्यांचे कर्तव्य व जबाबदारी पुर्ण केल्याचे दर्शविण्याकरीता वर नमुद गुन्ह्यात निर्दोष नागरीकांना व युवकांना खोटेपणाने गोवले आहे.खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळे गुन्ह्यातील निर्दोष युवकांचे शैक्षणिक जिवन व पुढील आयुष्य विस्कळीत झाले असुन पुढील जीवन अंधःकारमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळे युवकांच्या मनात पोलीस प्रशासना विरुध्द आक्रोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने या निवेदनाचा सहानुभुतीपूर्वक व न्यायपूर्वक विचार करून निर्दोष युवकांविरुध्द दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत संबंधीत पोलीस अधिकारी यांना योग्य ते आदेश द्यावे या मागणीचे निवेदन शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांनी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील साहेब यांना दिले. यावेळी माजी तालुका अध्यक्ष रमेश पाटील, युवासेना शहर प्रमुख राज सुसरे,शुभम ढवळे,महादेव सपकाळ उपस्थीत होते.

0 9 4 7 5 8
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *