केकतउमरा येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

Khozmaster
3 Min Read
“भव्य मिरवणुकीला पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने बौद्ध बांधवांचा अथांग महासागर”
“२९ एप्रिल रोजी, डॉ.राजरत्न आंबेडकर यांचे समाजप्रबोधन पर व्याख्यान, तर ३० एप्रिल रोजी प्रबोधनात्मक बुद्धभीम गीतांचा सुप्रसिद्ध गायक वैभव खुणे यांचा कार्यक्रम संपन्न”
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर*
वाशिम प्रतिनिधी ; वाशिम जिल्ह्यातील  महाराष्ट्र सह जिल्ह्यातील पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेले चळवळीतील गाव म्हणजे केकतउमरा तिथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९७ वी व विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली. जयंती उत्सवाचे आयोजन दिनांक २९ एप्रिल व ३० एप्रिल या दोन दिवसीय करण्यात आले होते.
तर २९ एप्रिल रोजी सकाळी ध्वजारन सामूहिक वंदना सांस्कृतिक कार्यक्रम व सायंकाळी ७ ; ०० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर त्यांचे समाज प्रबोधनात्मक व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या पंचक्रोशीतून बौद्ध उपासक तथा उपाशीका तथा गावकरी मंडळी व इतरही मंडळींच्या मोठा प्रतिसाद लाभला होती.डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक, राजनीतिक,व भारतीय संविधानातील समता बंधुता न्याय हक्क समानता या संविधानिक मूल्य बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था या सर्व विषयांवर माहितीपर व्याख्यानातून दिले.
३० एप्रिल रोजी सकाळी ८ ;०० वाजता तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुपारच्या सुमारास भव्य मिरवणूक शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली होती. या मिवणुकीदरम्यान जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील बुद्ध उपासाचा तथा उपाशीका व इतरही नागरिक यांचा हजारोच्या संख्येने अथांग महासागर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता.मिरवणुकी दरम्याने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सजावट रथ  व आडोळी येथील समता सैनिक दल लेझीम पथक,एकबुर्जी येथील नवयुवक पंचशील मित्र मंडळ लेझीम पथक,पंचशील क्रीडा मंडळ लेझीम व आखाडा सादरीकरण पथक केकतउमरा,मातोश्री डी.जे डिजिटल साऊंड वाशिम व इत्यादींचा समावेश होता. या दोन्ही दिवशी  कार्यक्रमाला आमंत्रित सर्व मान्यवर मंडळी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व सदस्य कार्यवाहक तथा सरपंच ग्रामपंचायत सदस्य व पंचशील क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते व बौद्ध उपासक तथा उपाशीका व पंचक्रोशीतील बौद्ध अनुयायी व नागरिकांचा मोठा सहभाग होता. शांतता व सुव्यवस्था प्रस्तापित राहावी यासाठी वाशिम ग्रामीण पोलीस व जिल्हा RCP पथक यांचा वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार जगदीश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात होता. दोन दिवसीय कार्यक्रमाला मोठा सहभाग लाभला या दोन दिवशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रफुल पट्टेबहादूर, यांनी केले.तर सर्वांचे आभार प्रदिप पट्टेबहादुर यांनी मानले.
0 9 3 7 0 7
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *