बुलडाणा ( प्रतिनिधी)
(National Education Policy 2020) अनिवार्य असून शंभर टक्के लागू होणार आहे. तरुणांना संपत्ती म्हणून तयार करण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आवश्यक असून पुढील काळ शिक्षकांसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय नैतिक कर्तव्य म्हणून याकडे बघा आणि विद्यार्थ्यासाठी आदर्श मॉडेल तयार करा,असे प्रतिपादन प्रा. सुबोध चिचोले यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज येथे आज 7 मे रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संदर्भात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रा सुबोध चिचोले बोलत होते या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थांनी मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे हे होते यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. सुबोध चिंचोले म्हणाले की बारावीनंतर ४० टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणात येतात. उर्वरित पदवी, अन्य अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. पारंपरिक अभ्यासक्रमाबाबत अनास्था असल्याने काही विद्यार्थी प्रवेशच घेत नसतील. उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची रचना बदलली आहे . या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास आता कौशल्य, आवडीचे शिक्षण, मेजर- मायनर, ऑन जॉब ट्रेनिंग, विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे. एनईपीत रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांना हे सांगणे गरजेचे आहे असे ते म्हणाले .. २०२४-२५ या शैक्षणिक क्षेत्रापासून पदवी अभ्यासक्रमांना एनईपी लागू होईल . त्यामुळे अशा अभिमुकता कार्यशाळांची गरज असल्याचे मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे त्यांनी व्यक्त केली. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा वाय टी वाघ यांनी केले या कार्यशाळेला मॉडेल कॉलेजमधील प्राध्यापक प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या….
मॉडेल डिग्री कॉलेज येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात कार्यशाळा संपन्न
Leave a comment