खडकपूर्णा प्रकल्पाची उंची वाढवा व चिखली शहरासाठी तात्काळ नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करा-मनसे

Khozmaster
3 Min Read

चिखली:- शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पेनटाकळी व खडकपूर्णा सारखे मोठे मोठे प्रकल्प असतांना सुद्धा गेल्या १५-२० वर्षापासून आजही शहरातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी १५ ते २० दिवसा पर्यंत मिळत नाही व जे पाणी मिळते ते सुद्धा दूषित व पिण्यायोग्य नसते. यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला असून अनेक नागरिकांना किडनी स्टोन, पोटाचे विविध आजार इतर आजारांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे. नगरपालिका प्रशासन दरवर्षी शहरातील नळधारकांकडून पाणी कराच्या रूपाने पाणीकर सक्तीने वसूल करते परंतु नागरिकांना वर्षातून केवळ १० ते २० दिवस जेमतेम पाणीपुरवठा करण्यात येतो त्यामुळे नागरिकांकडून पाणीकराच्या रूपात घेत असलेला पाणीकर घेण्यात येऊ नये तसेच नगर पालिका प्रशासनाला पूर्ण वर्षभराचा पाणी कर का द्यावा? हा प्रश्न देखील बहुतांश नागरिकांना पडला आहे. चिखली शहराची वाढती लोकसंख्या तसेच नवीन हद्दवाढ लक्षात घेता दररोज स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे. यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर केलेला असून सध्या शहरातील हद्दवाढ लक्षात घेता नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करणे व त्याचा प्रस्ताव मागवणे गरजेचे आहे तरी आपण नगरपरिषद प्रशासनाला नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याबाबत आदेशित करावे व सदर प्रस्ताव सादर झाल्यानंतर खासबाब म्हणून मान्यता द्यावी. तसेच तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतीला वातावरणातील बदलामुळे पावसाळ्यात सुद्धा मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झालेली आहे. त्याकरिता खडकपूर्णा प्रकल्पाची उंची वाढवून या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाटाद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच ग्रामपंचायतच्या मदतीने ग्रामीण भागातील नागरिकांना या धरणातून पिण्यासाठी स्वच्छ शुद्ध पाणीपुरवठा कसा करता येईल याचे नियोजन करावे. ज्या मुळे तालुका टँकर मुक्त होईल. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाटाद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्यास तालुक्यात हरितक्रांती घडून शेतकऱ्यांचा जीवनमानात सुधारणा होईल व शेतकऱ्यांचे आत्महत्या थांबतील. तरी वरील उपयुक्त मागण्या आपण पूर्ण कराव्या असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांचे नेतृत्वाखाली मा. ना. गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र शासन यांना चिखली येथे भेट घेऊन देण्यात आले याप्रसंगी लवकरच या बाबत प्रसाशकिय पातळीवर बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेऊ असे आश्वासन मा.ना.गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाला दिले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद खरपास,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील असोले, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष अरुण येवले,महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अंकित कापसे, ऋत्विक बिराडे, संकेत काळे, अंकित इंगळे भूषण भानुसे,मयुर पऱ्हाड,योगेश गोरे,आकाश देवकर,ज्ञानेश्वर जुमडे इतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

 

0 8 9 4 5 7
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *