मराठवाड्यात आणखी चार दिवस पाऊस अन् गारपीट,’या’ भागात ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी

Khozmaster
1 Min Read

 छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस पूर्वमोसमी असल्याचे अंदाज होता. मात्र, पूर्वमोसमी पावसाला वेळ आहे, असे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाने मराठवाड्याला झोडपले आहे. या पावसामुळे जीवितहानी झाली आहे. वादळासह झालेल्या पावसामुळे पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गारपीट आणि पावसामुळे कमाल तापमान घटले आहे. मात्र, इतर नुकसान वाढलले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशीव आणि बीड जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बुधवार, १५ मेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मंगळवारी गारपिटीची शक्यता आहे.

जिल्ह्यातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून मोठा बदल होत आहे. आज, सोमवारी (१३ मे) ऑरेन्ज अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेच्या मतदान प्रक्रियेवर वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस असेल तर मतदान केंद्रावर मतदार भिजू नयेत, या संदर्भात विशेष व्यवस्था करण्यात आली पाहिजे, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे. पाऊस आणि वादळामुळे मतदानासाठी नागरिक बाहेर काढण्याचे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *