पारोच्या स्मृतीदिनी इतिहास प्रेमींचे अभिवादन..!

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
अजिंठ्याच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणाऱ्या पारोच्या 168 व्या स्मृतीदिनानिमित्त स्थानिक इतिहास प्रेमींनी अभिवादन केले. स्थानिक आदिवासी कन्या पारो व अजिंठा लेणीच्या संवर्धनासाठी इंग्रज शासनाने नियुक्त केलेला इंग्रज अधिकारी रॉबर्ट गिल यांची देश, भाषा, प्रांत यांना भेदणारी अजरामर प्रेम कहाणी इतिहासात
प्रसिद्ध आहे. पारोचा मृत्यू झाल्यानंतर तिच्याविषयी असलेल्या अत्यंत प्रेमापोटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रॉबर्ट गिल याने 23 मे 1856 साली अजिंठा येथील पोलीस ठाणे परिसरात तिची कबर बांधून तिच्या कबरीवर *TO THE MEMORY OF MY BELOVED PAROO, WHO DIED  23rd MAY 1856* असे कोरले आहे. दरवर्षी या दिवशी अनेक इतिहास प्रेमी पारोच्या कबरीवर अभिवादन करण्यास येतात. अजिंठा येथील स्थानिक इतिहास प्रेमींनी सकाळीच पारोच्या कबरीला  पुष्पहार, फुले वाहून अभिवादन केले. स्थानिक इतिहास संशोधक विजय पगारे यांनी पारोच्या स्मृतीला उजाळा दिला. या वेळी अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले, स्थानिक इतिहास संशोधक विजय पगारे, बिट जमादार संदीप कोथळकर, संदीप मानकर, अरुण चव्हाण देशमुख ,राष्ट्रीय संघटक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती सतीश चव्हाण, संजय जाधव, मनोहर घुले, शेख आसिफ, शेख नईम, राहुल अंभोरे, संजय कसारे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
पारोच्या कबरीला विकासाची झालर …!
पारोच्या स्मृती स्थळावर सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु असून इतिहास प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. याठिकाणी पर्यटकांना स्वच्छता गृह, गार्डनिंग, कबरीला संगमरवरी आच्छादन, स्वागत कमान, सुरक्षा रक्षक कबीन, पार्किंग झोन आदी कामे प्रगती पथावर आहेत. सदर कामे जोड रस्ते व पारोची कबर योजने अंतर्गत होत असून कबरीकडे येणारा रस्ता, व गावातील अंतर्गत रस्ते सुद्धा पर्यटन विभागाने बांधून द्यावे अशी मागणी इतिहास
प्रेमींनी केली आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *