छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजी नगर : यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू असतात काहींना यश मिळते तर काहींना अपयश मिळते परंतु काहींना अभ्यास करण्याकरता पोषक वातावरण असते तर काहींना अभ्यास करण्याकरता पोषक वातावरण नसते , तरीसुद्धा काही विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर मात
करत यशाला गवसणी घालतात तशीच देव्हारी येथे अतिशय प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या *कुमारी वैष्णवी विनोद इंगळे* *ह्या जिद्दीच्या व मेहनतीच्या भरोशावर दाखवून दिले की कुठल्याही प्रकारचे ट्युशन* नसताना शाखेमध्ये चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण होऊन वैष्णवी इंगळे या मुलीने विज्ञान
शाखेमधून ६०० पैकी ५०४ गुण मिळवून यश संपादन केले आहे, कुमारी वैष्णवी विनोद इंगळे या मुलीची घरची परिस्थिती अतिशय बेताची आई-वडील मोल मोजरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत परंतु मुलीला त्यांनी कुठल्याही प्रकारची कसर ठेवली नाही ट्युशन नसतानाही वैष्णवी ने सुद्धा अतिशय मेहनत घेऊन चांगल्या मार्कानी हे यश संपादन केले आहे,
तिची टक्केवारी ८४ % एवढी आहे तिने मिळवलेल्या २० यशाबद्दल तिचे सर्व स्तरांमधून कौतुक व अभिनंदन होत आहे.