“पिक विम्याच्या रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा.” खरीप तोंडावर.. तरी ही पिक विमा मिळेना

Khozmaster
3 Min Read
विमा कंपनीने बळीराजाच्या तोंडाला पुसली पानं; माजी सभापती चव्हाण
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव  तालुक्यामध्ये सुमारे ४२  हजार ७५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून यावर्षी एका रुपयात पिक विमा काढण्याची शासनाने सुविधा उपलब्ध करून दिल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. मात्र खरिपातील पिक विमा काढून आठ – नऊ महिने दूसरा खरीपाचा हंगाम तोंडावर आला तरी अजून पिक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी त्रस्त झाले असल्याचे मत सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली होती.त्या शेतकऱ्यांना विमा देण्यात आला आहे.आणि ज्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली नाही.त्याच्या तोंडाला पाने पुसली आहे.
 सोयगाव तालुक्यात ८४ गावे असून ६५ ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावांचा विकासगाडा सुरू आहे. तालुक्यात सुमारे ४२ हजार 300 क्षेत्रावर पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी प्रथमच शासनाने पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपयाचा हिस्सा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी पिक विमा भरताना पिक विमा केंद्रावर शंभर रुपयापर्यंत संचालकांनी शेतकऱ्याकडून रक्कम वसूल केली. विविध कागदपत्रे अपलोड करण्याच्या नावाखाली सदरील पैसे घेण्यात आले. परंतु त्याचाही भुर्दंड शेतकऱ्यांनी सहन केला. पिक विमा काढून आता आठ ते नऊ महिने झाले आहे मात्र अजूनही शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे संकट असताना पिक विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु अजूनही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना पिक विमा वेळेवर मिळत नसल्याने पिक विमा बद्दल शेतकऱ्यात नाराजीचा सूर पसरला आहे. दुष्काळातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा त्यांच्या बँक खात्यात पाठवावा अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहे.
….
// दुष्काळात तेरावा महिना //
सोयगाव तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कुठे कमी तर कुठे अवकाळी असे असल्यामुळे संपूर्ण दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहे. त्याचबरोबर पिक विमा काढलेली रक्कमही पिक विमा कंपनीने अद्याप दिली नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळ तेरावा महिना दिसू लागला आहे.
▪️विमा कंपनीत तुपाशी तर शेतकरी उपाशी
“”””पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांचा एक रुपयाचा हिस्सा घेऊन केंद्र व राज्य शासनाकडून पीक विम्यापोटी मोठा हिस्सा विमा कंपनीला मिळाला आहे. मात्र एवढी रक्कम देऊनही शेतकऱ्यांना पीक विम्याचा एक रुपयाचाही फायदा झाला नसल्याने शेतकऱ्यात नाराजीचा सूर पसरला आहे. विमा कंपनी तुपाशी तर शेतकरी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा शेतकरी आरोप करू लागले आहे.
धरमसिंग दारासिंग चव्हाण माजी सभापती सोयगाव
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *