डोंबिवली – शहरातील फेज २ मध्ये असलेल्या एका कंपनीत दुपारी मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असं सांगितलं जात होतं. परंतु जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच अशी माहिती स्टीम बॉयलरचे संचालक धवल अंतापूरकर यांनी दिली आहे.
धवल अंतापूरकर म्हणाले की, बॉयलर हा शब्द सर्वश्रूत आहे. रिएक्टर माहिती नसतं. त्यामुळे काहीही स्फोट झाला तर बॉयलर संबोधलं जातं. त्यामुळे माध्यमांशी शहानिशा करून माहिती द्यावी. बऱ्याचदा रिएक्टर असेल किंवा एअर रिसिव्हर टँक फुटला तरी बॉयलर स्फोट झाला हे सांगतात. ज्या कंपनीत स्फोट झाला तिथे कुठल्याही प्रकारचा बॉयलर वापरात नाही हे पडताळणीत आम्हाला आढळलं. त्यामुळे हा बॉयलरचा स्फोट नसून हा रिएक्टरचा स्फोट असल्याचं दिसून येते असं त्यांनी सांगितले.