हैद्राबाद येथे मास्टर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल
पत्रकारिता क्षेत्रात लीडर निर्मल आपली ख्याती प्राप्त करणारे दैनिक खोजमास्टरचे मुख्य संपादक महाराष्ट्राचे मुख्य संपादक रमेश चव्हाण यांनी नुकत्याच हैदराबाद येथे पार पडलेल्या 22-24 मे तीन दिवसिय मास्टर फेडरेशन कप नॅशनल चॅम्पियनशिप 2024 मध्ये लॉंग जंप ,100 मीटर रनिंग ,पाच किलोमीटर रनिंग यामध्ये अनुक्रमे ब्रांझ ,सिल्वर ब्रांझ मेडल पटकावलं 45 वर्षे वयोगटाच्या या स्पर्धेत देशासह विदेशातील स्पर्धकांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता.
हैदराबाद फेडरेशन कडून प्राप्त माहितीनुसार, 22 मे रोजी सायंकाळी लॉंग जंप स्पर्धेमध्ये 45 वयोगटात कर्नाटक ,केरळ ,तेलंगणा महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश श्रीलंका , आसाम,येथील एकूण 18 स्पर्धकांनी सहभाग नोंदवा. या स्पर्धेत रमेश चव्हाण यांनी 4.10, 4.68,4.83 अशाप्रकारे जंप करत ब्रांझ मेडल प्राप्त केले.
23 मे रोजी सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या पाच किलोमीटर रनिंग स्पर्धेमध्ये गच्ची बोली स्टेडियमवर एकूण 25 स्पर्धकांनी या वयोगटात सहभाग नोंदवला. श्रीलंका चे धावपटू ने 15.08 मिनिटांत तर हरयाणा येथील खेळाडूनी 16.5 मिनिटांत तर रमेश चव्हाण यांनी 17.8मिनीटात ही स्पर्धा पुर्ण करत ब्रांझ मेडल मिळवून आपली विजयी वाटचाल सुरू ठेवली. सायंकाळी 7 वाजता संपन्न झालेल्या शंभर मीटर स्प्रिंट स्पर्धेमध्ये 12.08 सेकंदात ही शर्यत संपवत सिल्वर मेडल प्राप्त केले , या स्पर्धेत पंजाब येथील युवकाला गोल्ड आसाम येथील युवकाला ब्रांझ मेडल प्राप्त झाले. 100 मीटर रनिंग मध्ये अठरा युवकांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये एक स्पर्धकाला तीन स्प्रिंट मारावी लागली. हैदराबाद येथील उन्हाळ्याच्या अति उष्ण वातावरणामध्ये खेळाडूंना उकाड्यचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक खेळाडूंना उष्माघाताचा फटका बसला तर काही खेळाडू धावत असताना मैदानावरच कोसळले, बॉडी डीहायड्रेट झाल्यामुळे अपेक्षेप्रमाणे खेळाडूंना आपले कौशल्य सादर करता आले नाही.
फेडरेशन असोसिएशनच्या वतीने हैदराबाद येथे घेण्यात आलेल्या तीन स्पर्धेमध्ये दोन ब्रांझ,एक सिल्वर मेडल प्राप्त करत रमेश चव्हाण यांनी पत्रकार सुद्धा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे सिद्ध करून दाखवले. 45 वर्ष वयोगटात देशासह श्रीलंका ,बांगलादेश येथील अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सतरा राज्य तसेच आणि विदेशी स्पर्धकासह हैदराबादी येथील या स्पर्धेचा अनुभव अतिशय विलक्षण आणि प्रशंसनीय होता असे रमेश चव्हाण यांनी सांगितले. रमेश चव्हाण यांनी यापूर्वी दहा फुल मॅरेथॉन, 14 हाफमॅरेथॉन, तसेच कोल्हापूर येथील हाफ आयर्न मॅन ( बर्गमन) लोणावळा येथील पन्नास किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन अशा अनेक स्पर्धेत भाग घेऊन त्या वेळेत पूर्ण केल्या आहेत. मागील चार वर्षापासून रमेश चव्हाण सतत मैदानी स्पर्धेची तयारी करीत आहे. धावपळीच्या जीवनात पत्रकारांनी सुद्धा आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे अशा प्रकारचे आवाहन यावेळी रमेश चव्हाण यांनी केले.
ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी खेळाडू रमेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता कसून सराव करणार असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील खेळाडूंनी परिस्थितीचे भांडवल न करता आपली शरीर ही संपत्ती हे लक्षात ठेवत कठीण परिश्रम करा तुम्हाला यश निश्चित मिळेल. स्पर्धेचा सराव करत असताना स्पर्धा ही वेळेसोबत ठेवा ,प्रॅक्टिस करत असताना डाइट्स ,ग्राउंड, कोच या गोष्टीचे भांडवल करू नका, मनात जिद्द, चिकाटी आणि प्रचंड सराव केला तर कोणत्याही स्पर्धेत यश मिळवणं कठीण नसते. कोणत्याही स्पर्धेत आपले उत्कृष्ट प्रदर्शन करावे म्हणजेच यश अपयश याला महत्त्व राहत नाही तर आपण आपल्या प्रति सकारात्मक ऊर्जा घेऊन मैदानात उतरल्याचा आभास होतो.
युवकांनी खेळाकडे वळल्यास व्यसनाधीनता ,नैराश्य कमी होते. त्यामुळे सोशल मीडिया मोबाईलवर व्यसनाधीन न होता मैदानी खेळ खेळावे सुदृढ शरीर प्राप्त करत आपल्या देशासाठी ऑलम्पिक खेळण्याची तयारी सुद्धा युवकांनी ठेवावी. 45 वर्षे वयोगट असलेला म्हातारा जर अशा पद्धतीच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपले नामांकन प्राप्त करू शकतो तर निश्चितच युवकांनी याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे.
पुढील काळात यापेक्षा कठीण परिश्रम करणार असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करावयाचे स्वप्न उराशी बाळगलेले आहे. असे रमेश चव्हाण यांनी याबाबत बोलताना सांगितले.