धावत्या बीएमडब्लू कारवर बसून स्टंटबाजी करणं भोवलं, कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांची कडक कारवाई

Khozmaster
2 Min Read

ल्याणमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू कारवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता. ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवित होता.

ही कार त्या अल्पवयीन मुलाची आहे. पोलिसांनी या प्रकरणात स्टंटबाज तरुण शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात अल्पवयीन कारचालकाचा प्रताम समोर आला आहे. त्या पाठोपाठ ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोरुन एक बीएमडब्लू कार येताना दिसली. या कारला पाहताच रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचारी आणि अन्य वाहन चालकांना धक्का बसला. ही कार कोणी तरी चालवित होता. मात्र त्या कारच्या बोनेटवर एक तरुण पाय पसरुन मस्तपैकी बसला होता. तो या कारच्या राईडचा आनंद घेत होता. भर रस्त्यात चालत्या कारच्या बोनेटवर तरुण पाय पसरुन बसला होता. ती कार रस्त्यावर धावत होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहताच बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या स्टंटबाज तरुणाचा शोध सुरु केला.

पोलिसांकडून आरोपींवर गुन्हा दाखल

व्हिडिओ आढळून येणारी कार आणि स्टंटबाज मुलगा पाहून पोलिसांनी या कारचा नंबर तपासला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेतले. कारवर बसून स्टंट करणारा तरुण शुभम मितालिया होता. मात्र तो बोनेटवर बसला आणि कारचे स्टेरिअंग त्याने अल्पवयीन मुलाच्या हाती दिले होते. कार चालविणारा मुलगा अल्पवयीन आहे. शुभम हा कल्याण पश्चिमेत राहतो. तर कार चालविणारा अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्वेत राहतो. ही कार अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्याला घेऊन दिली आहे. या दोघांना ताब्यात घेतले. शुभम मितालियासह अल्पवयीन कारचालकाच्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *