केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन प्रतापराव जाधव पोहोचले लोकसभेवर

Khozmaster
2 Min Read

मुंबई : राज्यातील ४८ नवनिर्वाचित खासदारांपैकी टक्केवारीमध्ये सर्वांत जास्त मते पडली ती भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना. एकूण वैध मतांच्या ६५.६८ टक्के मते त्यांनी घेतली.

सर्वांत कमी मतटक्का बुलडाण्याचे शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचा राहिला. केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन ते लोकसभेवर पोहोचले.

५० टक्के वा त्यापेक्षा अधिक मते मिळविणाऱ्या खासदारांमध्ये पीयूष गोयल, ओमराजे निंबाळकर, प्रतिभा धानोरकर, स्मिता वाघ, डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, छत्रपती शाहू महाराज, नितीन गडकरी, रक्षा खडसे, गोवाल पाडवी, नामदेव किरसान, मुरलीधर मोहोळ, सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, अरविंद सावंत, डॉ. अमोल कोल्हे, सुनील तटकरे या १७ खासदारांचा समावेश आहे. ४० टक्क्यांच्या आत मते मिळूनही जे उमेदवार जिंकले त्यांना मत विभाजनाचा फायदा झाला.

विजयी उमेदवार
पीयूष गोयल
ओमराजे निंबाळकर
प्रतिभा धानोरकर
स्मिता वाघ
श्रीकांत शिंदे
नरेश म्हस्के
छत्रपती शाहू महाराज
नितीन गडकरी
रक्षा खडसे
गोवाल पाडवी
नामदेव किरसान
मुरलीधर मोहोळ
सुप्रिया सुळे
प्रणिती शिंदे
अरविंद सावंत
अमोल कोल्हे
सुनील तटकरे
राजाभाऊ वाजे
अनिल देसाई
डॉ. शिवाजी काळगे
नारायण राणे
श्यामकुमार बर्वे
वर्षा गायकवाड
विशाल पाटील
धैर्यशील मोहिते
श्रीरंग बारणे
अमर शरद काळे
संजय दिना पाटील
संजय देशमुख
शोभा बच्छाव
उदयनराजे भोसले
प्रशांत पडोळे
रवींद्र वायकर
नीलेश लंके
वसंतराव चव्हाण
भास्कर भगरे
संजय जाधव
भाऊसाहेब वाकचौरे
बजरंग सोनवणे
बळवंत वानखडे
कल्याण काळे
हेमंत सावरा
नागेश आष्टीकर
धैर्यशील माने
सुरेश म्हात्रे
अनुप धोत्रे
संदीपान भुमरे
प्रतापराव जाधव

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *