सत्तेचा माज असलेल्यांचा राजकीय हिशोब केल्याशिवाय राहत नाही – सुनील केदार

Khozmaster
3 Min Read
हिंगण्यात महाविकास आघाडीची विजयी रॅली
संगीता तायडे.
दै, खोजमास्टर.
       हिंगणा .
रामटेक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे याच्या ऐतिहासिक विजया निमित्त हिंगणा येथे महाविकास आघाडीची विजयी रॅली व आभार सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
     हिंगणा विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना सहा विधानसभेपैकी हिंगणा विधानसभेने सर्वाधिक मताधिक्य देऊन इतिहास घडवला त्या मतदारांचे आभार मानण्याकरिता भव्य विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत रविदास महाराज, भोलशहा दर्गा यांना नमन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. विजय रॅलीत नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय पाटील घोडमारे, जि. प अध्यक्ष मुक्ता कोक्कडे, उपाध्यक्ष कुंदा राऊत,जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग यांनी खुल्या जीप मधून मतदारांचे अभिवादन केले. रॅलीचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आभार सभेत रूपांतर झाले.
       मी राजकारण स्वतःसाठी नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी करतो पण ज्यांना राजकारणातून मिळालेल्या सत्तेचा माज येतो त्यांचा मी हिशोब केल्याशिवाय राहत नाही. हिंगणा विधानसभेतील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी मिळवून देईल असे सभेला संबोधित करतांना सुनील केदार म्हणाले.
       तर सभेला संबोधित करतांना बंग यांनी हिंगणा विधानसभेतून पंधरा हजारापेक्षा जास्त मताधिक्य लोकसभेच्या उमेदवाराला देणार असा संकल्प केला होता तो मायबाप मतदारांनी पूर्ण करून दिला त्यासाठी मतदारांचे आभार मानले. तर नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी सर्वात जास्त वेळ आणि निधी हिंगणा विधानसभेला देणार असल्याची ग्वाही दिली.
 सभेला माजी आमदार विजय घोडमारे, जि प अध्यक्ष मुक्ता कोक्कडे, यांनी संबोधित करून मतदारांचे आभार मानले.
       प्रास्ताविक दिनेश बंग यांनी संचालन लीलाधर दाभे यांनी तर आभार. संजय जगताप यांनी मानले.
           , रॅली सभेला जि प उपाध्यक्ष कुंदा राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते दिनेश बंग, सभापती मिलिंद सुटे, सभापती राजकुमार कुसुबे, नागपूर बाजार समिती सभापती अहमदभाई शेख, उपसभापती प्रकाश नागपुरे, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख उत्तम कापसे, जि प माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, जि प माजी सभापती उज्वला बोढारे, भारती पाटील, जि. प.सदस्य वृंदा नागपुरे, सदस्य संजय जगताप, ममता धोपटे, माजी जि प सदस्य रश्मी कोटगुले, राकापा तालुकाध्यक्ष योगेश सातपुते, संजय कुंटे, संजय चिकटे, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, बबनराव आव्हाडे,पस सभापती सुषमा कडू, रुपाली मनोहर,वाडी शहराध्यक्ष वसंतराव इखणकर, श्याम मंडपे, रवी जोडांगळे, सुनील बोंदाडे, सुशील दीक्षित,मिथिलेश कनेरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद उमरेडकर, शिवसेना उबाठा तालुकाध्यक्ष विष्णू कोल्हे, प्रवीण खाडे, शशिकांत थोटे, सरपंच शारदा शिंगारे, सिराज शेटे, उमेश राजपूत, , प्रवीण सिंग,नाना शिंगारे, मुकेश पाल, विलास वाघ, दिनेश उईके,भाई सिरसाट, सोपान बेताल, शालिनी मनोहर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *