भाजपाला आत्मचिंतनाची आवश्यकता;रवी काळे
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जालना लोकसभा मतदारांनी खासदार रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेनां डावलून डॉ कल्याण काळे यांचा हात का धरला ? याचे आत्मचिंतन करावे असे मत काँग्रेसचे सोयगाव तालुका शहर प्रमुख रवी काळे यांनी अशा भावना व्यक्त केल्या आहेत.तसेच सोयगाव सिल्लोड विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत. अबकी बार चारशे पारचा नारा देत भाजपा निवडणूक रिंगणात उतरल्यावर नवीन पदाधिका यांनी उंटावरुन शेळ्या राखण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावावर भाजपाला मते मिळतील या आत्मविश्वासाने कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहचले नाहित. शहरात कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झाल्यामुले मतदानात घट झाली. भाजपने मागील काळात
रद्द केलेले ३७० कलम, राम मंदिर निर्माण, तीन तल्लाक, सी ए ए असे घेतलेले स्तुत्य निर्णय काहींच्या पचणी पडले नाहीत. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर असल्याने मुस्लीम बांधवांनी त्यांची साथ सोडली. जरांगे पाटलाच्या मराठा आंदोलनाचा परिणाम मराठा मतदारावर झाला. संविधान बदलण्याच्या अफवेमुळे दलीत मते काँग्रेसकडे वळली. याबाबतीत सत्यता समजावून सांगण्यात भाजपचे कार्यकर्ते कमी पडले. वरिष्ठ नेत्यांनी भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतील
कार्यकर्त्यांची मुख्य पदावर वर्णी लावली. त्यामुळे जुन्या भाजपा कार्यकर्त्यात नाराजीचा सूर होता. परिणामी मतदानात घट झाली. जुन्या कार्यकर्त्यांबाबत माजी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेई यांनी अतिशय जबाबदार वक्तव्य केले होते ते असे ङ्ग मेरी एक बात गांठ बांध लेना, हमारा एकभी पुराना कार्यकर्ता टूटना नही चाहिए, नए चाहे दस टूट जाए. क्यो की पुराना कार्यकर्ता हमारे जीत की गरंटी है और नए पर विश्वास करना जल्दबाजी है ङ्ग या वक्तव्याची अमल बजावणी आवश्यकता आहे.असे मत काँग्रेसचे शहर प्रमुख रवी काळे सोयगाव यांनी बोलताना सांगितले आहे.