यंदाच्या देवी मिरवणुकीत डीजेचा दणदणाट नाही

Khozmaster
2 Min Read

पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरेंचा देवी मंडळांना कारवाईचा इशारा

 

ध्वनिमापनासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात

यंदाच्या चार आँक्टोंबरला नवदुर्गा विसर्जनदिनी डीजेचा दणदणाटाने नागरिकांच्या कानठळ्या बसणार नाहीत.कारण डीजेचा वापर करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दस्तुरखुद्द शहर पोलिस निरिक्षक प्रकाश अहिरे यांनी नवदुर्गा मंडळांना दिला आहे.यंदा वाद्यांमुळे होणा-या ध्वनीप्रदुषणाचे मापन करण्यासाठी पोलास प्रशासनाने विविध पथके सज्ज ठेवली आहेत.मिरवणूकीत बॉम्बशोधक श्वानपथकही तैनात राहणार आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कायदा व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे पोलिस निरिक्षक अहिरे यांनी सांगितले.

मिरवणूकीत जर कोणी डीजे व तत्सम ध्वनी प्रदूषण करणारी वाद्ये वाजवितांना आढळला तर यंत्राद्वारे त्याचे मापन करण्यात येऊन पंचासमक्ष देवी मंडळांवर कारवाई करत गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.तसेच डीजे वाद्यही जप्त केले जाईल,असे अहिरे म्हणाले.

यंदा “आवाज वाढव डीजे तुला आयची शपथ आहे”..नाय!

 

डीजेवरील बंदीमुळे वाद्यशौकिनांना “आवाज वाढव तुला आईची शपथ आहे”,या गाण्यानुसार डीजेचा आवाज वाढविता येणार नाही.त्यामुळे वाद्यशौकिनांनी डीजे वाजविण्याचा अट्टहास व भलतीच जिद्द करु नये;अन्यथा पोलिस कारवाई करतील,असे अहिरेंतर्फे सांगण्यात आले.

 नवदुर्गा मंडळांचा मिरवणूकीत सहभाग..

 

 

यंदाच्या देवी विसर्जन मिरवणूकी ५७ नवदुर्गा मंडळांचा सहभाग राहणार असल्याची माहिती शहर पोलिसांतर्फे देण्यात आली.

वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करा…

 

मुख्य मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा,असे आवाहन पोलिस प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

 

शहरातून २४१ जण होणार तडीपार…

 

कलम १४४ प्रमाणे २४१ जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला असून, लवकरच त्यांना तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

 

शहरात तगडा पोलीस बंदोबस्त

 

जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक स्वतः उपस्थित राहणार असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

 

०२ उपविभागीय पोलिस अधिकारी

४० पोलिस अधिकारी

४७१ पोलिस अंमलदार

१७० गृहरक्षक दलाचे जवान

०३ आर सी पी पथक

०१ एस आर पी एफ चे पथक

तैनात राहणार आहे.

0 9 2 6 4 8
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *