कार्तिक आर्यन ‘चंदू चॅम्पियन’ पाहा फक्त 150 रुपयांत! निर्मात्यांची भन्नाट ऑफर…

Khozmaster
1 Min Read

भिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. स्पोर्ट्स ड्रामा फिल्म ‘चंदू चॅम्पियन’ हा भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा बायोपिक आहे.

या चित्रपटामध्ये कार्तिक मुरलीकांतची भूमिका साकारत असून हा चित्रपट आज (१४ जून) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चाहते या सिनेमाची आतुरतने वाट पाहत होते. चाहत्यांना हा सिनेमा फक्त 150 रुपयांत पाहता येणार आहे.

कबीर खानने हा सिनेमा दिग्दर्शित केला. तर साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी संयुक्तपणे सिनेमाची निर्मित केली आहे. ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा यासाठी निर्मात्यांकडून एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. फक्त आज शुक्रवारी (१४ जून) देशभरात सिनेमाच्या तिकीटाची किंमत ही फक्त १५० आहे. कुठल्याही थिएटरमध्ये तुम्ही ‘चंदू चॅम्पियन’ हा सिनेमा फक्त 150 रुपयांमध्ये पाहू शकता.

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *