खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे शंभर वर्षापूर्वीपासूनची मागणी खामगाव जालना रेल्वे मार्गाची आता ५ वर्षात पूर्ण होणार. रेल्वे मंत्री अश्विनकुमार यांच्या मैत्रीमुळे या कामाला अधिक वेग देता येईल अशी माहिती या जिल्ह्याचे खासदार नवनिर्वाचीत केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी ‘देशोन्नती’ सोबत बोलतांना दिली. गुरूवारी शेगाव दर्शन आटोपून खामगाव येथे सत्कार नंतर स्थानिक महाराजा मसाला उद्योग येथे ते देशोन्नती सोबत बोलत होते. वैनगंगा ते पैनगंगा नदीजोड प्रकल्पाच्या कामासाठी रक्कम मंजूर झालेली असून त्या कामालाही गती मिळेल असेही ते म्हणाले. ना. प्रतापराव जाधव आणि उद्योजक संतोष डिडवाणी यांच्या पक्क्या मैत्रिची माहिती संपूर्ण जिल्ह्याला आहे. त्यामुळेच मेहकरकडे जातांना ना. प्रतापराव जाधव यांनी महाराजा मसाला येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी अनेक प्रतिष्ठित व ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. ना. जाधव यांचेसोबत आमदार अॅड. फुंडकर हे पण होते. दुकानात येताच ‘महाराजा आ. फुंडकरांनी पुन्हा मसाल्याचा सुंगध दरवळला’ असे म्हटले तेव्हा एकच हशा पिकला. कारण मागच्या निवडणुकीत खा. जाधवांच्या विरोधात उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी गांधी चौकातील एका सभेत प्रतापराव जाधव यांना ‘महाराजा मसाल्याचा वास’ येतो असे म्हटले होते