बुलढाणा : केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर जिल्ह्याचे भूमिपुत्र ना. प्रतापराव जाधव यांचे १३ जून रोजी सकाळी पहिल्यांदाच जिल्ह्यात आगमन झाले. शेगाव रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी ना. जाधव यांचे जल्लोषात स्वागत केले. शेगावात आल्या आल्या ना. जाधव यांनी संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विशेष म्हणजे संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करत असताना ना. प्रतापराव जाधवही काही वेळ पालखीत सहभागी झाले. वारीत सहभागी वारकऱ्यांच्या चरणांवर माथा टेकून नामदार जाधव यांनी संतांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे नामदार प्रतापराव जाधव यांचा मंत्री म्हणून जिल्ह्यात पहिलाच दिवस त्यांना ‘धन्य आज दिन संत दर्शनाचा’ अशी अनुभूती देणारा ठरला. केंद्रीय आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी ना. जाधव यांच्या खांद्यावर आली आहे. शपथविधी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. एकंदरीत जिल्ह्याच्या भूमिपुत्राला देशसेवेसाठी आशीर्वाद संतांकडून आज प्रभार आणि काही प्रशासकीय कामकाजामुळे ना. जाधव दिल्लीत होते. मंत्री म्हणून त्यांचे जिल्ह्यात आगमन होत असल्याने जिल्ह्यातल्या शिवसैनिकांसह त्यांच्यावर प्रेम करणारे सारेच उत्साहात होते. शेगाव रेल्वेस्थानकावर सकाळी ५.३० ला ना. जाधव यांचे दमदार स्वागत झाले. याच कार्यकर्त्यांच्या बळावर मंत्रीपद मिळाले असल्याची जाण असल्याने ना. जाधव यांनीही प्रोटोकॉल, सुरक्षा सगळं काही बाजूला ठेवून स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. त्यानंतर संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. श्रींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यातही सहभागी होऊन केंद्रीय मंत्री ना. जाधव यांनी वारकऱ्यांच्या चरणांवर माथा ठेवून आशीर्वाद घेतले. ना. जाधव यांचे कुटुंबीय देखील वारकरीच. कोरोना काळातील २ आषाढीवाऱ्यांचा अपवाद वगळता आतापर्यंत स्वतः ३९ आषाढी वाऱ्या केल्याचे ना. जाधव यांनी गुरुवारच्या मुहूर्तावर मिळाले. त्यामुळेच ना. प्रतापराव जाधवांसाठी गुरुवारचा दिवस ठरला, संत दर्शनाचा !