अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. त्याला जाऊन आज 4 वर्ष झाली. 14 जून 2020 रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
त्याच्या निधनानंतर अख्खी इंडस्ट्री हादरुन गेली होती. सुशांतसाठी आजही त्याचे कुटुंबीय, चाहते न्याय मागत आहेत. सुशांतचा जवळचा मित्र अभिनेता महेश शेट्टीने (Mahesh Shetty) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या का केली? त्याला आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केले होते का? त्याची हत्या झाली का? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करत होतं पण काहीच पुरावे हाती न लागल्याने केस क्लोज झाली. अभिनेता महेश शेट्टीने मित्राच्या आठवणीत लिहिले,”अजून किती काळ? आणखी एक वर्ष सरलं. असं म्हणतात गोष्टींना वेळ दिला की सगळं ठीक होतं. पण सततचे प्रश्न या गोष्टी अजून कठीण करत आहे. मी वाट बघतोय, कायद्यावर विश्वास ठेवतोय पण मला सर्वकाही जाणून घेण्याचा हक्क आहे. आम्हाला सगळं काही जाऊन घेण्याचा हक्क आहे.
Users Today : 36