मराठी कलाकार अनेकदा एकमेकांना टोपणनावाने हाक मारताना दिसतात. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कलाकारांना खडे बोल सुनावले होते. यावरुन मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवचे देखील राज ठाकरेंनी कान टोचले होते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने हा किस्सा सांगतिला आहे.
सिद्धार्थने नुकतीच रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने राज ठाकरेंचा एक किस्सा सांगितला. सिद्धार्थने त्याच्या एका लेखात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा उल्लेख “तेंडल्या” असा केला होता. त्यावरुन राज ठाकरेंनी फोन करत सिद्धार्थची कानउघाडणी केली होती. सिद्धार्थने हा किस्सा शेअर केला आहे. सिद्धार्थ म्हणाला, “२०१८ मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये मी वर्ल्ड कपवर राइट अप लिहायचो. ते लेख मी माझ्या भाषेत लिहायचो. त्यामध्ये मी आज धोनी तर सॉलिड खेळला आणि तेंडल्या आज सेंच्युरी मारणारच…असं लिहायचो. तर एक दिवशी मला राज ठाकरेंचा फोन आला. हॅलो सिद्धार्थ जाधव, राज ठाकरे बोलतोय”.
Users Today : 1