बुलढाणा, ११ जून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७१ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच दिल्लीत पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे खासदार प्रता पराव जाधव यांची वर्णी लागली असून त्यांनी नुकताच आरोग्य राज्यमंत्र्याचा पदभार स्विकारला आहे.
हा पदभार स्विकारल्यानंतर प्रतापराम जाधवांनी घोषणा केली की, ते मृत्यूनंतर अवयवदान करणार आहेत, सलग चारवेळा लोकसभेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून जाण्याचा विक्रम करुणारे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुषय मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार सोपविण्यात आला आहे. यासोबतच आरोगा व कुटुंब कल्याण खात्याचेही राज्यमंत्री महणून ते काम पहाणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री म्हणून ते आयुष खात्याचा स्वतंत्र कारभार पहाणार असल्याने व्यांचे थेट रिपोर्टींग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना रहाणार आहे.
साधारणतः राज्यमंत्र्यांकडे स्वतंत्र प्रभार असल्यास अशा मंत्र्यांचे बेट रिपोर्टीग है। पंतप्रधानांकडे असल्याचे गृहीतक आहे. त्यामुळे शिंदसेनेची एका राज्यमंत्री पदावर बोळवण करण्यात आले असल्याची टिका विरोधकांकडून होत असली तरी आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र काभार पहाण्याची जबाबदारी त्यांच्याकेड रहाणार आहे. आज ११ जून रोजी त्यांनी आज त्यांच्या पदाचा पदभार स्विकारला. आपल्या खात्याचा देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापराव जाधव
यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी खातेवाटप झालं, आयुष्य आणि आरोग्य कुटुंब
कल्याण मंत्रालय जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी अध्यात्मिक गुरु योगाचार्य श्री श्री श्री पविशंकर यांची सहकुटुंब जाऊन भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. देशातील जनतेची आरोग्य सेवा करून लोकाभिमुख कार्य करा अशा सदिच्छा पर आशीर्वाद रविशंकरजी यांनी त्यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी राजश्री जाधव, जवाई सोहम वायाळ, मुलगी नम्रता, मयुरीताई, ऋषिकेश जाधव, डॉ गोपाल ठिके आणि राहूल सोलंकी होते.