अमेरिका-आयर्लंड सामना रद्द केल्याची घोषणा झाली अन् नंतर आला ट्विस्ट; ५-५ षटकांची मॅच

Khozmaster
2 Min Read

 ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 8 गटात भारत, ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी प्रवेश निश्चित केला आहे.

श्रीलंका, ओमान, नामिबिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, युगांडा, श्रीलंका हे संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. गतविजेता इंग्लंडही त्याच वाटेवर आहे आणि पाकिस्तानची वाटचाल ही अमेरिका व आयर्लंड या लढतीवर अवलंबून आहे. अमेरिका विरुद्ध आयर्लंड हा सामना फ्लोरिडा येथे होणार आहे आणि हा सामना अमेरिकेने जिंकल्यास पाकिस्तानच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. पण, सद्यस्थितीत तिथे जोरदार पाऊस पडतोय आणि हा सामना रद्द होणे, पाकिस्तानच्या हिताचे नाही. पण, पाकिस्तानी चाहत्यांसाठी जे घडायला नको होतं तेच झालं आणि ९ वाजता हा सामना रद्द झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.

अ गटातून भारताने सुपर ८ मधील जागा पक्की केली आहे आणि आता दुसऱ्या स्थानासाठी यजमान अमेरिका ४ गुणांसह आघाडीवर आहे. पाकिस्तान ( २) व कॅनडा ( २) यांनाही संधी होती. पण, या दोन्ही संघांच्या शेवटच्या साखळी सामन्यावर पावसाचे सावट आहे. अमेरिकेच्या लढतीतही पावसाची शक्यता होती आणि हा सामना रद्द झाला तर अमेरिका ५ गुणांसह अ गटातून सुपर ८ साठी पात्र ठरेला असता. पाकिस्तान व कॅनडा शेवटचा साखळी सामना जिंकून ४ गुणापर्यंतच पोहचू शकणार आहेत. अमेरिका आणि आयर्लंड सामना पावसामुळे रद्द करावा लागल्याने पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येणार आहे.

पाकिस्तानला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध त्यांनी पाट्या टाकल्या. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला आणि त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर चौफेर टीका सुरू झाली. तिसऱ्या सामन्यात कॅनडावर विजय मिळवून पाकिस्तान शर्यतीत कायम राहिला होता, परंतु आजच्या निकालावर त्यांचे भविष्य अवलंबून आहे. आता हाती आलेल्या अपडेटनुसार १० वाजता खेळपट्टीची पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे. हा सामना ५-५ षटकांचा खेळवण्यात येणार आहे

0 8 9 4 7 0
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *