मुंबई – गेल्या वर्षापासून विमान प्रवासी संख्येत झालेली लक्षणीय वाढ तसेच विमानाला विलंब, अशा गोष्टी अनेकदा समोर येत आहेत. अशा स्थितीतही अकासा विस्तारा विमान कंपनीची विमाने मे महिन्यात सर्वाधिक वेळेवर असल्याची माहिती नागरी विमान मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून पुढे आली आहे.
या क्रमवारीत विस्तारा कंपनीची विमाने दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्यावर्षी विक्रमी संख्येने देशात विमान प्रवास झाला होता.
प्रवाशांची संख्या अधिक आणि विमानांची संख्या अपुरी, यामुळे विमान प्रवासाला अनेकवेळा लक्षणीय विलंब झाला आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांत प्रथम विस्तारा आणि नंतर एअर इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्यावरून रजा आंदोलन केले होते. त्याचाही फटका विमान प्रवाशांना बसला होता. मात्र, मे महिन्यात अकासा कंपनीची विमाने ८६ टक्के निर्धारित वेळेवर राहिल्याचे दिसून आले. तर विस्तारा कंपनीची विमानाच्या वेळेवर राहण्याचा दर हा ८२ टक्के इतका आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंडिगोची विमाने आहेत. त्यांचा दर ७५ टक्के इतका आहे. एअर इंडिया कंपनी चौथ्या क्रमांकावर असून, त्यांचा दर ७३ टक्के इतका होता.