अनेकांचं शरीर कमजोर आणि ताकद नसल्यासारखं असतं. अशा लोकांसाठी एक अशी भाजी आहे जी खाऊन तुम्ही दूध आणि अंडीपेक्षाही जास्त ताकद मिळू शकते. इतकंच नाही तर तुमची हाडं मजबूत करण्यासाठी यातून भरपूर कॅल्शिअमही मिळतं.
तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तर अनेकदा खाल्ली असेल पण वरील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली पाहिजे. शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅल्शिअम असतं.
शक्तीशाली होईल शरीर
शेवग्याच्या पानांचं पावडर बनवून त्याचं सेवनही करू शकता. तसेच सॅलड, अंड्यांवर काटूनही खाऊ शकता. तसेच याचं सूप बनवूनही पिऊ शकता. तसेच हे पावडर ज्यूस, नारळ पाण्यात टाकूनही पिऊ शकता. एक चमचा पावडर, त्यात थोडा लिंबाचा रस टाकूनही सेवन करू शकता. याने किडनी आणि लिव्हर डिटॉक्स होतं.
Users Today : 36